31 C
Latur
Thursday, January 21, 2021
Home नांदेड सोशल मिडियावर जोरदार प्रचार ; आता नाही तर कधीच नाही

सोशल मिडियावर जोरदार प्रचार ; आता नाही तर कधीच नाही

एकमत ऑनलाईन

सगरोळी : ग्रामपंचायत निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली असून सोशल मिडीयावर प्रचाराची धुम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आता नाहीतर कधीच नाही, अशी ताकदीची धडक जोरदार सुरू आहे. अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून सरपंच पद काबिज करण्यासाठी छंगछंग पिछाडले आहेत. मात्र मतदार एैन वेळी कोणाला पसंती देतील हे मात्र गुलदस्त्यात आहे.

बिलोली तालुक्यातील सगरोळी ग्रामीण भागात सध्या ग्रामपंचायत निवडणूकीचे वारे जोरात वाहत असून माघील निवडणूकी पेक्षा या निवडणूकीमधे फेसबुक, वॉटसप, सोशल साईटवर प्रचाराच्या तोफा धडाधताना दिसत आहे. अशा प्रकारे सोशल मिडियाचा माध्यमातून प्रचाराला सुरूवात झाली आहे. आता नाही तर कधीच नाही अशा प्रकारे मँसेजेस व्हॉटसप, फेसबुक, ग्रुपवर व्हायरल होत आहे. ग्रामपंचायत निवडणूकीसाठी अर्ज माघारी व चिन्ह वाटपानंतर निवडणूकीसाठी रंगत आली असून गावागावात निवडणूकीसाठी तरुणाईचा उत्साह शिगेला पोहचला आहे. यामध्ये तरूण वर्ग व गावपुढा-्यांनाकडून सोशल मिडियाचा वापर होताना दिसून येत आहे.

कॉर्नर बैठका, वार्ड बैठक, प्रचार व ऐन मतदानाच्या तोंडासमोर प्रस्थापित लोकांनी गरिबांच्या घरात जाऊन चटणी भाकर खाणे सुरू केले आहे. तर इच्छूक उमेदवारांनी व कार्यकर्ते यांच्या बैठका सुरू आहेत यातून चांगलाच उमेदवार गावासाठी मिळावा यासाठी कार्यकत्याची मोर्चे बांधणी सुरू आहे. विविध प्रकारे व्हिडोओ आणि अँडिओ चिञाची रेलचेल दिसून येत आहे. मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे इमेजेस, नेम्स,याचा सुध्दा वापर केला जात आहे. माजी ग्रामपंचायत सदस्य मंडळी यांना सुध्दा सोशल मिडियाचा वापर करावा लागत आहे या निवडणूकीमधे व्हिडोओचा वापर केला जात आहे. आता नाही तर कधीच नाही अशा प्रकारचे मँसेजेस, वॉटसप, फेसबुक, ग्रुपवर व्हायरल होत आहेत.

पर्यावरण संवर्धनासाठी सांगोल्यात वृक्ष बँकेची स्थापना

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,414FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या