27.3 C
Latur
Tuesday, October 19, 2021
Homeनांदेडमृग नक्षत्राची पहिल्याच दिवशी नांदेडात जोरदार सलामी

मृग नक्षत्राची पहिल्याच दिवशी नांदेडात जोरदार सलामी

एकमत ऑनलाईन

नांदेड : मृग नक्षत्र मंगळवारपासून सुरू झाले असून या नक्षत्रानं पहिल्याच दिवशी मध्यरात्रीच्या सुमारास शहर परिसरासह नांदेड जिल्ह्यात जोरदार सलामी दिली आहे. बुधवारी सकाळी सातच्या सुमारास शहरातील महावीर चौकात असलेले लिंबाचे जुने झाड रस्त्यात कोसळले.यामुळे विद्युत तारा तुटून काही वेळ या भागातील बत्ती गुल झाली होती.तर वाहतुकीचाही खोळंबा झाला होता. दरम्यान पहिल्या पावसाने उकाडा कमी झाल्याने सर्वांना दिलासा मिळाला आहे.

गेल्या महिन्याभरापासून नांदेड जिल्हयात वादळ वा-यासह अवकाळी पावसाचे तांडव सुरू होते.अनेक वेळा झालेल्या या अवकाळी पावसामुळे शेतक-यांच्या फळ पिकांसह भाजीपाला,हळद,केळी,आंबा या पिकांचे मोठे नुकसान झाले.तर या दरम्यान खरिप हंगामाची शेतक-यांची तयारी सुरू होती.त्यातचही अनेक वेळा कामाचा खोळंबा होता.अशाच परिस्थितील शेतकरी खरिपाची पुर्व तयारी पुर्ण करून मृग नक्षत्रातील पहिल्या पावसाच्या पतिक्षेत होते. मृग नक्षत्रास मंगळवारपासून सुरूवात झाली असून या नक्षत्रानं पहिल्याच दिवशी मध्यरात्रीनंतर दोन वाजल्यापासून पावसास सुरूवात झालीक़ाही वेळात पावसाचा चांगलाच जोर वाढला.यानंतर जवळपास एक ते दिड तास शहर परिसरासह नांदेड जिल्ह्यात जोरदार सलामी दिली.

नायगाव, हिमायतनगर, अधार्पूर या तालुक्यात आणि अन्य तालुक्यातील काही भागात जोराचा पाऊस झाला आहे.तर नांदेड शहरात या पावसाच्या जोराने बुधवारी सकाळी सातच्या सुमारास महावीर चोैकात असलेले एक लिंबाचे भले मोठे जुने झाड कोसळून रस्त्यात आडवे पडले.यामुळे काही विद्युत तारा तुडून या भागातील बत्ती गुल झाली होती.तर या मार्गावरील वाहतुकीचाही खोळंबा झाला होता.सदर माहिती भाजपचे पदाधिकारी दिलीपसिंग सोडी यांनी मनपाचे सहायक आयुक्त मिर्झा बेग,अग्निशमन अधिकारी रईस पाशा व महावितरणचे कर्मचा-यांना दिली.यानंतर सदर झाड तोडून रस्त्याच्या बाजूला काढण्याचे काम सुरू करण्यात आले. जिल्ह्यात मान्सूनपूर्व काळातही चांगलाच पाऊस झाला. एक ते सात जून या काळात जिल्ह्यातील १६ पैकी ९ तालुक्यात सरासरी पेक्षा आधिक पाऊस झाला आहे.

या पावसामुळे वातावरणातील उष्णतेत घट झाली आहे. तर वेळेवर झालेल्या पावसामुळे ग्रामीण भागात एकुणच उत्साह संचारला असून शेतकरी जोमाने कामाला लागला आहे. अद्यापही ११ जून पर्यंत पाऊस होण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. या काळात चांगला पाऊस झाला तर हळद, कापूस, केळी लागवड सुरू होणं तसेच मुग, ऊडीद, सोयाबीन, पिवळी ज्वारी पेरणीचा शुभारंभ होईल अशी आपेक्षा आहे.

कोरोनाने अनाथ झालेल्या मुलींच्या लग्नासाठी मंगल कार्यालय विनामुल्य मिळणार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या