25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeनांदेडआरोग्य विभागाकडुन कोविड लसीकरणासाठी धडपड; ग्रामिण भागातिल नागरिकाकडुन समीश्र प्रतीसाद

आरोग्य विभागाकडुन कोविड लसीकरणासाठी धडपड; ग्रामिण भागातिल नागरिकाकडुन समीश्र प्रतीसाद

एकमत ऑनलाईन

कंधार (सय्यद हबीब) : कंधार तालुक्यात आतापर्यंत शहरी व ग्रामीण भागातील बारूळ, कुरूळा, उस्माननगर, पानशेवडी आणि पेठवडज प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाऱ्या १६ हजार ६१६ नागरिकांनी लसीचा पहिला डोस, तर ८५२ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. सद्या आरोग्य विभागाकडून कोविड प्रतिबंधात्मक मोफत लस दिली जात आहे, परंतु ग्रामिण भागात समीश्र प्रतीसाद मिळतांना दिसुन येत आहे उपविभागीय अधिकारी पांडुरंग बोरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार व्यंकटेश मुंडे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. सूर्यकांत लोणीकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साहेबराव ढवळे, गटविकास अधिकारी कैलास बळवंत यांच्यासह डॉक्टर्स आणि कर्मचारी वर्ग यांनी लसीकरण मोहिमेबाबत परिश्रम घेत आहेत.

तालुक्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या बारुळ आणि त्याअंतर्गत आरोग्य उपकेंद्रातून २ हजार ३४४ नागरिकांनी लसचा पहिला, तर ३० नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. तर कुरुळा आणि त्याअंतर्गत आरोग्य उपकेंद्रातून ३ हजार ३६७ नागरिकांनी पहिला डोस घेतला तर ३९ नागरिकांनी दुसरा डोस घेतला उस्मान नगर आणि त्या अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रातून २ हजार १३४ नागरिकांनी पहिला डोस तर दुसरा डोस ४१ नागरिकांनी घेतला आहे तर पानशेवडी आणि त्या अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रातून ३ हजार २४२ नागरिकांनी पहिला लसीकरणाचा डोस घेतला तर फक्त ८ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे पेठवडज आणि त्या अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रातून १ हजार ९९६ लसीकरणाचा पहिला डोस घेतला तर दुसरा डोस ५५ नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.

शहरात आत्तापर्यंत ३ हजार १६७ नागरिकांनी पहिला, तर ६७४ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. सद्या करण्यात येणाऱ्या लसिकरणा बाबत शहरातील काही भाग वगळता ग्रामिण भागात भिती व गैर समजाचे वातावरण नागरीकांच्या मनात दिसुन येतो, लसी संदर्भात नागरीक भिती पोटी पाहीजे तसा प्रतीसाद देत नाहीत. लस घेतल्यास ताप, अशक्तपणा या सारखे आजार उद्भवतात आणी ताप आल्यास आपली टेस्ट पॉझीटीव्ह येऊन आपल्याला कोविड सेंटरमध्ये भरती व्हावे लागेल हि शंका नागरीकात आसल्याचे मत नागरिक व्यक्त करतांना दिसतात. लसिकरणा संदर्भात राजकिय पुढारी, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधींनी आणि सुजान नागरीकांनी जनजागृती करण्याची गरज आहे

दरम्यान, लसीकरणासाठी नागरिकांत थोड्याफार प्रमाणात का होईना जाणीव जागृती होत असून दिवसेंदिवस लसीकरणाचा आलेख वाढत जात आहे, त्यामुळे आता लसीचा तुटवडा भासू नये ज्यांनी लसीचा पहिला डोस घेतला त्यांना ४० दिवसांनंतर लसीचा दुसरा डोस उपलब्ध असावा अशी मागणी पूढे येत आहे.

पंजाबमध्ये एमएसपीची रक्कम बँक खात्यात जमा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या