33.9 C
Latur
Tuesday, March 9, 2021
Home नांदेड विद्यार्थ्यांनी मानले गुरूजनांचे ३५ वर्षांनंतर ऋण

विद्यार्थ्यांनी मानले गुरूजनांचे ३५ वर्षांनंतर ऋण

एकमत ऑनलाईन

नांदेड : जि.प.हायस्कुल कंधार येथील सन १९८६ मधील दहावीच्या विद्यार्थ्यांनी गेट टुगेदर मेळावा साजरा केला. कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता प्रतिनिधीक स्वरुपात ३ शिक्षकांचा यथोच्छीत सत्कार करत तब्बल ३५ वर्षांनी गुरूजनांचे ऋण मानले.कंधार येथील जि.प.शाळेमधील सन १९८६ मधील दहावीच्या विद्यार्थ्यांचा सोशल मिडीयाच्या माध्यमातून संपर्क झाल्यानंतर गेट टुगेदर घेण्याचा निर्णय झाला. या गेट टुगेदकर कार्यक्रमात शिक्षकांचा सत्कार करण्याचे ठरले. परंतु कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता प्रतिनिधीक स्वरुपात ३ शिक्षकांचा सत्कार करून ऋण व्यक्त करण्याचा निर्णय झाला.

अनिल कु‍-हाडे यांच्या संकल्पनेतून स्नहेमिलन कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भिंगे तर प्रमुख पाहुणे नारलवार, राठोड यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी शिक्षकांचा स्मृतीचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. त्यानंतर उपस्थित गुरूजनांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गुरूजनांनी तुम्ही शिकलात म्हणून आम्ही शिकवू शकलो. आज अनेक विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर, नगरसेवक, व्यापारी, उद्योजक, अधिकारी झाले आहेत. पुर्वी विद्यार्थ्याला शिक्षकाने मारल्याची तक्रार पालकाकडे केल्यास पालकच विद्याथ्यार्ला दोन देत होते. आज उलट झाले आहे. विद्याथ्यार्ला मारले तर पालक तक्रार करून गुन्हा दाखल करतात. अशी खंत व्यक्त केली. यावेळी माजी नगरसेवक कृष्णा पापीनवार यांनी कोरोनाचा संसर्ग लक्षात घेवून छोटासा गेट टुगेदर कार्यक्रम घेण्यात असून ३ शिक्षकांचाच सत्कार करण्यात आला.

सुत्रसंचलन विनायक पांगरेकर तर आभार निशीज कुलकर्णी यांनी मांडले. यावेळी मनिष अंबुलगेकर, हेमंत कासार, राजकुमार कोटलवार, संजय ढोबळे, कृष्णा मामडे, बालाजी राऊत, विलास मुखेडकर, दत्तात्रय मामडे, महेंद्र कंधारकर, विजय पदमवार, राजेंद्र ठेवरे, डॉ.अशोक मुंडे, अनिल वट्टमवार, नरेंद्र महाराज, शशिकांत चालीकवार, परमानंद व्यास, दत्ता मुंडे, भास्कर कांबळे, बालाजी जवादवार, उमाकांत फरकंडे, राजकुमार मुखेडकर, निळकंठ मोरे, रमेश चाटे, विश्वनाथ मठपती, लक्ष्मण श्रीमंगले, डॉ.अविनाश गायकवाड, दिपक चालीकवार, यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

पालघरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,445FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या