27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeनांदेडमाहुर तालुक्यातील विद्यार्थ्यांना पडला अभ्यासक्रमाचा विसर

माहुर तालुक्यातील विद्यार्थ्यांना पडला अभ्यासक्रमाचा विसर

एकमत ऑनलाईन

वाई बाजार : कोरोना विषाणूच्या भीतीने राज्यात आज पर्यंत शाळा बंद आहेत. शाळा बंद असल्याचे जास्तीत जास्त परिणाम तालुक्यातील ग्रामीण व दुर्गम भागात झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. इयत्ता १ ते ४ पर्यंत शिक्षण घेणारे जि.प शाळेतील विद्यार्थी चक्क अभ्यासक्रमच विसरले असल्याचे दिसून येत आहे. माहूर तालुक्यातील दुर्गम व ग्रामीण भागात इंटरनेट अभावी ऑनलाइन शिक्षण कुचकामी ठरत असून ग्रामीण भागतील विद्यार्थी गुणवत्तेत मागे पडण्याची भीती सुज्ञ नागरिकातून व्यक्त केली जात आहे.

कोरोणा विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉडाऊन करण्यात आले होते परंतु कोरोणा काही प्रमाणात नियंत्रणात आल्यानंतर लॉकडाऊन मध्ये पसेच नागरिकांना घालून दिलेल्या नियमांना शिथीलता आणण्यात आली. दरम्यान हळूहळू परस्थित बदल घडून येत असले तरी तालुक्यातील शाळा प्रत्यक्ष सुरू झाल्या नाही. ऑनलाईन शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र ग्रामीण व दुर्गम भागात इंटरनेट सुविधा प्रभावी नसल्याने ग्रामीण विद्यार्थी या शिक्षणापासून वंचित राहत आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील ८० टक्के पालकाकडे स्मार्टफोन नाही.

ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थी शाळा बंद असल्याने शालेय अभ्यासक्रम विसरले आहे. १ते १० पर्यंत चे पाढे म्हणता येत नाही. मराठी भाषेतील वाचन लेखन अचूक रित्या येत नाही.माहुर तालुका हा आदिवासी व बंजारा बहुल असल्याने शिक्षणाचा प्रसार कमी आहे. काही वर्षांपूर्वी आदिवासी समाजाची मुले शाळेत जायला घाबरत होती, परंतु शासनाने विद्याथ्यार्साठी अनेक उपाययोजना करून शिक्षणाच्या प्रवाहात आणून शिक्षणाची गोडी निर्माण केली. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा पटसंख्या चांगली आहे. परंतु आता शाळा प्रत्यक्ष भरत नसल्याने विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे पाठ फिरवली आहे.

पालकांसोबत शेतात जाऊ लागली असून अनेक मुले शेत शिवारात शेत काम करताना दिसत आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात जोडण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागणार आहे. कोरोणाचा शैक्षणिक स्तरावर मोठा परिणाम झाला असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही मोठे झाले असल्याचे दिसून येत आहे.

जम्मुतील हल्ल्यात मराठी जवान शहीद

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या