27.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeनांदेडपोलिस उपनिरिक्षकास धक्काबुक्की

पोलिस उपनिरिक्षकास धक्काबुक्की

एकमत ऑनलाईन

नांदेड : तहसीलदारांच्या आदेशानुसार ईस्लापूर शिवारातील एका शेत जमीनीचा ताबा देत असतांना काही जणांनी पोलिस उपनिरिक्षकाचा शर्ट धरून धक्कबुक्की केली. याबाबत ईस्लापूर पोलिसांनी चार जणांविरुध्द सरकारी कामात अडथळा केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

ईस्लापूर येथील पोलिस उपनिरिक्षक योगेश बाबुराव बोधगिरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि. १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजेच्यासुमारास ईस्लापूर शिवारातील गोपाळ पाटील यांची विवादीत जमीन शेत गट क्रमांक २८६ या जमीनीचा ताबा तहसीलदार किनवट यांच्या आदेशाने दिला जात होता. त्यावेळी योगेश बोधगिरे पोलिस संरक्षण घेवून तेथे हजर होते.

यावेळी दत्ताराम गणपती भोयर, शिवशंकर दत्ताराम भोयर, गणेश दत्ताराम भोयर आणि सुलोचना दत्ताराम भोयर यांनी पोलीस उपनिरिक्षकांचे शर्ट धरून धक्काबुक्की केली, त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि विषारी औषधाचा डब्बा हातात घेवून तुज्या नावाने पिऊन मरतो याबद्दल जोरजोरात ओरडले. ईस्लापूर पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक ९१/२०२२ भारतीय दंड संहितेच्या कलम ३५३, ३२३, ३०९, ५०४, ५०६ आणि ३४ नुसार दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास ईस्लापूरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक शेवाळे हे करीत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या