नांदेड : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड आणि महाराष्ट्र तलवारबाजी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय तलवारबाजी स्पर्धा दिनांक १३ ते १६ फेब्रुवारी रोजी नांदेड येथे संपन्न झाला. या स्पर्धेमध्ये १७ वषार्खालील मुलं व मुली यांनी कास्यपदक मिळवून यश प्राप्त केलेले आहे.
१७ वषार्खालील रिया बालाजी हंबर्डे व प्रणव अशोक वाघमारे या दोघांनी तृतीय क्रमांक कास्यपदक मिळवून यश संपादन केले आहे. या विजयी स्पर्धकाचे मन:पूर्वक अभिनंदन शाळेचे अध्यक्षा सौ. शैला पवार संचालक केशव गड्डम शाळेच्या मुख्याध्यापिका सौ लता तम्मेवार व सूर्यकुमार पिल्ले, श्रीकांत गड्डम, दुर्गा गड्डम, शाळेतील क्रीडा शिक्षक कासिम खान व निलेश डोंगरे यांनी यशस्वी मुले व मुलींचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.