32.3 C
Latur
Sunday, April 11, 2021
Homeनांदेडकेळीच्या बागेत टोमॅटो व दोडक्याचे यशस्वी आंतरपीक

केळीच्या बागेत टोमॅटो व दोडक्याचे यशस्वी आंतरपीक

एकमत ऑनलाईन

अधार्पूर (रामराव भालेराव) : केळीच्या बागायती पीकामध्ये टोमॅटो आणि दोडक्याचे यशस्वी अंतरपीक घेऊन अधार्पूर तालुक्यातील रोडगी आणि शेनी येथील शेतक-यांनी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. त्यामुळे केळीच्या बागेत टोमॅटो, दोडक्यांनी शेतक-्यांना मालामाल केले आहे. अधार्पुर तालुक्यातील शेतीला उर्र्ध्व पैनगंगा प्रकल्पाचे पाणलोट क्षेत्र असून येथील शेतजमीन शंभर टक्के बागायती आहे. त्यातच सुपीक जमीन असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात केळीची लागवड केली जाते.

मात्र मागील दोन – तीन वर्षांपासून केळीला योग्य भाव मिळत नाही. आणि मिळालाच तर त्या केळी पिकावर वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव जाणवतो. त्यामुळे केळी पिकातून शेतक-यांना पाहीजे तसे उत्पन्न मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. केळीला होणारा खर्च भरपूर आणि नफा मात्र कमी होत असल्यामुळे येथील काही चाणाक्ष शेतक-्यांनी हे तफावत दूर करण्यासाठी केळीच्या बागेत टोमॅटो आणि दोडक्याचे अंतरपीक घेऊन लाखोंचे उत्पन्न मिळविले आहे. केळीच्या बागेत टोमॅटो व दोडक्याचे अंतरपीक घेऊन मालामाल होण्याची किमया साधली आहे. अधार्पुर तालुक्यातील रोडगी येथील चाणाक्ष शेतकरी प्रकाश सितापराव आणि शेनी येथील प्रगतीशील शेतकरी सुभाषराव खांडरे यांनी दीड एकरात दोन हजार केळीची लागवड करून त्यात चार हजार टोमॅटोची झाडे लावली. आज त्या टोमॅटोचे उत्पादन सुरू झाले असून यातून दररोज ६० ते ७० कॅरेट टोमॅटोचे उत्पन्न मिळत असून बाजारात प्रति कॅरेट १५० ते १६० रुपये भाव मिळत आहे. यातून दोन लाखांचे उत्पन्न मिळणे अपेक्षित असल्याचे सुभाषराव खांडरे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

तसेच रोडगी येथील शेतकरी प्रकाश सितापराव यांनी त्यांच्या मालकीच्या शेतात सप्टेंबर महिन्यात दोन हजार केळीची लागवड केली. या केळीच्या बागेला पाणी देण्यासाठी शेतक-याकडे विहीर, बोअरवेल असून टंचाई काळात इसापूर धरणाचे मुबलक पाणी या शेतीला मिळते. या मुबलक पाण्याचा उपयोग घेऊन या केळीच्या बागेत दोडक्याची लागवड करून आंतरपीक घेण्याचे ठरविले. याकरिता त्यांनी तज्ज्ञाचे मार्गदर्शन घेवून तसेच बाजार भावाचा अंदाज घेवून शेतकरी प्रकाश सितापराव यांनी केळीच्या बागेत दोडक्याची लागवड केली. केळीसह दोडक्याच्या पिकांना पाहिजे त्या पद्धतीने सारख्याच प्रमाणात पाणी आणि अन्नद्रव्ये मिळावे यासाठी ५.५ बाय ५.५ फूट अंतरावर केळीची लागवड केली. केळीची एक सरी सोडून त्या दोडक्याची लागवड केली दोडक्याची वेल मोठी झाल्यानंतर बांबू आणि ताराच्या साह्याने संपूर्ण वेली योग्य पध्दतीने बांधल्या आहेत. अशा पध्दतीने लागवड केलेल्या दोडक्याच्या वेलींना हिरवीगार, लांबलचक दोडकी लागली.

नोव्हेंबर महिन्यात पहिली तोड झाली पाहिल्या वेळी कमी प्रमाणात दोडके निघाले तरी चांगला फायदा झाला. परंतु पुढील दोन आठवड्यात एक दिवस अंतराने ३ ते ४ क्विंटल दोडक्याची माल निघत आहे. आज रोजी दोडक्याच्या बाजारात प्रतिकिलो ७० ते ८० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. यामुळे जानेवारी पर्यंत दोडके राहतील असा अंदाज आहे. या दोडक्यापासून तीन ते चार लाखाचे उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे अशी माहिती प्रकाश सितापराव यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.

या वर्षी मुबलक पाऊस झाल्यामुळे यंदा केळीचेही भरपूर उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. केळी पिकासाठी ठिबकद्वारे सोडण्यात येणारे खत, पाणी केळी आणि केळीमधील आंतरपीक यांना मिळत असल्याने केळीसुद्धा चांगल्या दजार्ची असून केळीचेही भरपूर उत्पन्न मिळणार असल्याचे चित्र सध्या तरी शेतक-्यांना दिसत आहे. अशा प्रकारे रोडगी आणि शेनी येथील शेतक-यांनी आधुनिक शेती करून बागायती पिकात भाजी – पाल्याचे अंतरपीक घेऊन अर्थिक संकटात सापडलेल्या शेतक-यांना अधिक उत्पादन व लाखोंचे उत्पन्न मिळवून देण्याचा एक मंत्र दिला आहे. या यशस्वी शेतक-यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

शेतीला पाण्याची कमतरता नाही, परंतु केळीला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. शेतक-यांनी केळी या पीकामध्ये आंतरपीक म्हणून अन्य पिकांची लागवड करावी, जेणेकरून केळीला होणारा खर्च तरी निघून जाईल आणि केळी पासून मिळणारा पैसा फायदा म्हणून होईल. केळीमध्ये जसे मिरची, काकडी, दोडके, झेंडू, टमाटो आदी भाजीपाला पिकाची लागवड करता येईल. यापासून कमी कालावधीत भरपूर उत्पन्न मिळेल.
प्रकाश सितापराव
शेतकरी, रोडगी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या