26.9 C
Latur
Sunday, July 3, 2022
Homeनांदेडसरसम येथे तरुण शेतक-याची आत्महत्या

सरसम येथे तरुण शेतक-याची आत्महत्या

एकमत ऑनलाईन

हिमायतनगर : तालुक्यातील मौजे सरसम येथील शेत सर्वे नंबर २१४/२ मध्ये धम्मपाल सखाराम थोरात (३२) या तरुण शेतक-याने सततची नापिकी व कर्जास कंटाळून आपल्या शेतामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज दि. ६ जून रोजी घडली.

सततची नापिकी आणि कर्ज यामुळे त्रस्त असलेला धम्मपाल पेरणीचा हंगाम तोंडावर आल्याने पेरणीसाठी पैसे नसल्याच्या विवंचनेत होता. यातूनच त्याने टोकाचे पाऊ ल उचलले. या घटनेचा तपास हिमायतनगरचे पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार अशोक सिंगनवाड करीत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या