19.6 C
Latur
Sunday, February 5, 2023
Homeनांदेडलिंकिंग विरहित रासायनिक खतांचा पुरवठा करा

लिंकिंग विरहित रासायनिक खतांचा पुरवठा करा

एकमत ऑनलाईन

अर्धापूर : तालुक्यातील रासायनिक खत विक्रेत्यांना समान प्रमाणात खत पुरवठा होत नसून गरज नसलेल्या इतर खतांची ंिलकींग करुन अल्प प्रमाणात खत पुरवठा केला जातो. ही लिंकिंग पध्दत बंद करून सर्व कृषी सेवा केंद्र चालकांना समान प्रमाणात खत पुरवठा करावा. अन्यथा खत विक्री बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा तालुक्यातील कृषी केंद्र संंचालकांनी दि. २० जानेवारी रोजी जिल्हाधिका-्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

खरीप हंगाम २०२२ मध्ये पेरणीसाठी शेतक-याकडून मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांची मागणी होती. शेतक-याकडून मागणी असलेल्या डी. ए. पी., १० : २६ : २६, १२ : ३२ : १६, युरिया या मुख्य रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत होता. त्याचाच गैरफायदा घेत रासायनिक खत कंपन्या आणि घाऊक विक्रेते यांच्या संगनमताने मागणी असलेल्या मुख्य रासायनिक खतासोबत शेतक-याकडून मागणी नसलेल्या नॅनो युरिया, कंपोस्ट, मायक्रोनुट्रीयंट, वाटर सोलूबल खते अशा अनावश्यक खताची मुख्य खतासोबत लिंकिंग करण्यात आले होते. अशा प्रकारची लिंकिंग न करता समान खत वाटप करण्यात यावेत अशी मागणी कृषी सेवा केंद्र संचालकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

जिल्ह्यात तालुकानिहाय खतांचे समान वाटप करण्याची जबाबदारी कृषि विकास अधिका-्यांची असताना नांदेड मधील मोठे ठराविक घाऊक विक्रेते आणि रासायनिक खत कंपन्या त्यांच्या पद्धतीने कृषि विकास अधिकारी यांना डावलून फक्त ंिलंिकगचा माल घेणा-या विक्रेत्यानांच मोठ्या प्रमाणात खतांचे वाटप करत होते. हे सर्व चालू असताना यावर्षीच्या खरीप हंगामात ंिलंिकगच्या तक्रारी येवून सुद्धा कृषि विभागाने फक्त बघ्याच्या भूमिका घेतली होती. आजच्या परिस्थितीत रबी हंगामाची पेरणी संपून सुद्धा यूरिया या खतासोबत इतर गरज नसलेली खते घेण्याची जबरदस्ती ंिलंिकगच्या माध्यमातून करण्यात येत आहे. त्यामुळे काही ठिकाणी मागणी नसलेली इतर खते मुख्य खतासोबत शेतक-्यांना दिल्याने व त्याबाबत शेतक-याकडून तक्रारी झाल्याने ऐन खरीप व रबी हंगामात काही किरकोळ विक्रेत्यांचे खत विक्री परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या