24.6 C
Latur
Sunday, October 24, 2021
Homeनांदेडनांदेड जिल्ह्यात शेतकरी आंदोलनास पाठिंबा

नांदेड जिल्ह्यात शेतकरी आंदोलनास पाठिंबा

एकमत ऑनलाईन

नांदेड: केंद्र शासनाने केलेले तीन कृषी कायदे शेतकरी विरोधी असून हे कायदे रद्द करावेत या मागणीसाठी मंगळवारी भारत बंदची हाक दिली होती.या बंदचे ग्रामीण भागातही पडसाद उमटले. नांदेड जिल्ह्यातील विविध भागात बाजारपेठ बंद ठेवून पाठिंबा देण्यात आला.

देगलूर कडकडीत बंद
कृषी कायद्याच्या मुद्द्यावरून मोदी सरकार विरोधात पुकारलेल्या भारत बंदला देगलूरकर पाठिंबा दर्शवित मंगळवारी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळला. यावेळी आ. रावसाहेब अंतापूरकर , राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. अंकूश देसाई देगावकर. शिवसेना तालुकाप्रमुख महेश पाटील, प.स. माजी सभापती शिवाजी देशमुख बळेगावकर , जनार्धन बिरादार , नाना मोरे , सुमित कांबळे , माजी नगरसेवक मिरामोहिउद्दिन , बाबू मिनकीकर, बालाजी पाटील , काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. प्रीतम देसाई , कैलास येसगे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

माहूरात व्यापा-यांचा प्रतिसाद
शेतक-यांच्या आंदोलनाला पाठींबा दर्शविण्यासाठी राज्यात शिवसेना, रा.कॉ.कॉँग्रेस, किसान ब्रिगेड, प्रहार, वंचित बहुजन आघाडीसह डाव्या पक्षांनी पुकारलेल्या आजच्या बंदला माहूरात प्रतिसाद मिळाला. यावेळी शिवसेन तालुका प्रमुख सुदर्शन नाईक व शहर प्रमुख निरधारी जाधव, रा.कॉ. तालुकाध्यक्ष मेघराज जाधव, फिरोज दोसाणी, कॉँग्रेस तालुकाध्यक्ष तथा जि.प.सदस्य संजय राठोड व शहराध्यक्ष आनंद तुपदाळे , किसान सभेकडून कॉ.शंकर सिडाम व किशोर पवार,वंचित बहुजन आघाडीचे दादाराव गायकवाड,प्रहारकडून तालुकाध्यक्ष अमजद खाँ,विक्की मोरे, किसान ब्रिगेडचे अविनाश टनमने यांचेसह कार्यकर्ते व पदाधीका-यांनी आंदोलनात सहभाग घेतला.

लोहा शहरात बंद
सर्व विरोधी पक्षांच्या वतिने शहरात बंद पाळण्यात आला. काँग्रेस कमिटीचे लोहा शहर अध्यक्ष वसंत पवार माजी उपनगराध्यक्ष वेंकटेश (सोनु ) संगेवार, विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक पंचशील कांबळे, माजी नगरसेवक पंकज परिहार शाम पाटील पवार,पांडुरंग दाढेल,युवक काँग्रेसचे बाबासाहेब बाबर पाडुरंग शेटे,माजी नगरसेवक अनिल दाढेल माजी नगरसेवक चंद्रकांत नळगे, माजी नगरसेवक उत्तम महाबळे माजी युवक काँग्रेस मोहन महामुने,सतिश निखात शेतकरी व असंख्य कार्यकर्ते या बंदमध्ये सहभागी झाले होते.

शेतकरी विरोधी कायदे रद्द करा
केंद्र सरकारने मंजुरी दिलेल्या शेतकरी विरोधी कृषी कायद्याच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंदला मुखेडकरांनी प्रतिसाद दिला. याआंदोलनात भाजप सोडुन सर्वच सामाजिक राजकीय पक्ष संघटनेचे कार्यकर्ते सहभागी होते.यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष शिवशंकर पा.कलंबरकर, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी गेडेवाड, प्रहार तालुकाध्यक्ष शंकर वड्डेवार यांनी नियोजन केले. याआंदोलनास काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष, छावा, संभाजी ब्रिगेड, डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम समाजसेवा समिती, किसान क्रांती संघटना पदाधिकारी,शेतकरी, कार्यकर्ते सहभागी होते.

भोकरला संमिश्र प्रतिसाद
शहरात या भारत बंदला व्यापा-यांनी संमिश्र प्रतिसाद दिला.या बंदला महाराष्ट्रातील महा विकास आघाडीच्या सरकारनेही पाठिंबा दिला होता. परंतु भोकर शहरात म्हणावा तसा या बंदला प्रतिसाद दिसून आला नाही. अनेक व्यापा-यांनी आपापले प्रतिष्ठान उघडले होते. तेव्हा शहरातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रॅली काढून प्रतिष्ठान बंद करून भारत बंदला पाठिंबा द्या असे आवाहन करत शहरातून फिरत होते. रॅली जाताच पुन्हा आपली प्रतिष्ठाने चालू केली.

विविध संघटनेचा पाठिंबा
कृषी कायद्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला बाजारपेठ बंद ठेवून हदगाव येथे महाविकास आघाडी व विविध संघटनेने पाठींबा दिला.आ. माधवराव पाटील जवळगावकर,तालुका अध्यक्ष आनंदराव भंडारी, नगरसेवक वसंतराव देशमुख,युवक काँग्रेसचे अध्यक्ष संदीप पाटील शिंदे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेरमन त्रंबक पाटील हडसनीकर, माजी जिल्हा परिषद सदस्य पंजाबराव पाटील,चेरमन पांडुरंग खंदारे,नगरसेवक अमित अडसूळ, उपनगराध्यक्ष सुनीलभाऊ सोनूल यांच्यासह अनेक संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

कंधारला निदर्शने,फुलवला बंद
केंद्र सरकारच्या शेतकरी कायद्याविरोधात कंधारात महाविकास आघाडीच्या वतीने निदर्शने करण्यात आले.तर फुलवल येथे बाजारपेठ बंद ठेवून पाठिंबा देण्यात आला. केंद्र सरकारने जाचक असलेला शेतकरी कायदा रद्द करावा यासाठी महाविकास आघाडीच्या व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कंधार बंदची हाक देण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी , शिवसेनेचे तालुकाध्यक्ष धनराज लुंगारे , काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय भोसीकर, माजी नगरसेवक गणेश कुंटेवार, नगरसेवक मन्नान चौधरी, हमिद सुलेमान, रामचंद्र येईलवाड,पंचायत समिती सदस्य उत्तम चव्हाण,शेख शेरुभाई, कॉंग्रेसचे सतिश देवकत्ते, सुरेश कल्हाळीकर, वंचिताचे नेते प्रेमानंद गायकवाड आदि उपस्थित होते.तर फुलवळ येथे स्वयंत्स्फूर्तीर्ने व्यापारी व पदाधिका-यांनी प्रतिसाद देत कांहीं काळ मार्केट व रस्ता बंद करून सौम्य आंदोलन करण्यात आले.

शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’ला महाराष्ट्रात संमिश्र प्रतिसाद, ग्रामीण भागात कडेकोट बंद !

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या