25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeनांदेडशेतक-यांची फसवणूक करणा-या कृषी अधिका-यांवर कारवाई करा

शेतक-यांची फसवणूक करणा-या कृषी अधिका-यांवर कारवाई करा

एकमत ऑनलाईन

कंधार : कृषी दुकानदाराशी संगनमत करून कृषी अधिकारी प.स. हे दुकानदाराशी आर्थिक संगनमत करून शेतक-यांकडे दुर्लक्ष करीत आहेत. यामुळे दुकानदार मनमानी पद्धतीने खताची व बोगस बियाणाची विक्री करून शेतक-यांची फसवणूक केली जात आहे. शेतक-यांना न्याय न मिळवून देणा-या कृषी अधिका-यावर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे शिवसेनेचे कंधार तालुकाप्रमुख परमेश्वर जाधव यांनी केली आहे.

खरीप हंगाम जवळ आला शेतकरी खत व बियाणासाठी दुकानावर खरेदीसाठी गर्दी चालू आहे. मात्र दुकानदार नामांकित खताचा तुटवडा दाखून चढ्या भावाने बिक्री करत आहेत. तसेच त्यांच्या सोबत लिंकिंग खत देऊन शेतक-याची मोठ्याप्रमाणात फसवणूक करत आहेत. असे असताना देखील कृषी अधिकारी प.स.व तालुका कृषी अधिकारी मूग घेऊन गप्प आहेत. यांची गुप्त माहिती घेतले असता कृषी अधिकारी प.स. हे दुकानदाराशी आर्थिक संगनमत करून शेतक-याकडे दुर्लख करत आहेत.

यामुळे दुकानदार मनमानी पद्धतीने खताची व बोगस बियाणाची विक्री करून शेतक-यांना लुटत आहेत. येत्या चार दिवसात ती तात्काळ थांबवावी द शेतक-यांना न्याय मिळवून देण्यासाठी तालुक्यातील कृषी दुकान धारकांना आपल्या कार्यालयामार्फत शेतक-यांना माहिती मिळवून देण्याकरिता प्रत्येक दुकानांच्या दर्शनी भागावर उपलब्ध असलेल्या विविध कंपन्यांच्या बी-बियाणांची आणि खतांची नावे, त्या दुकानदा-याकडे उपलब्ध असलेला माल
फलकावर नमूद करण्यास बंधनकारक करावे.

शेतक-यांना दुकानदाराकडून मुळ देयकांची शासनाने ठरविलेल्या दराप्रमाणे पावती देणे बंधनकारक करावे, तसेच शेतक-यांना कच्ची पावती देणा-या विक्रेत्यावर कार्यवाही करून परवाना रद्द करावा. कंधार शहरात अन तालुक्यात कृषी दुकानदार व्यवसायाकडून मोठया प्रमाणावर खतांची साठवणूक करणा-या आणि वस्तीमध्ये रासायनिक बी-बियाणे खतांची साठवणूक करणा-या विक्रेत्यावर महाराष्ट्र राज्य शासनाने ठरवलेल्या नियमांची अंमलबजावणी करून त्या विक्रेत्यावर कारवाई करावी.

बेकायदेशीर विनापरवाना खतांची साठवणूक करणा-या गोडाऊन धारकास विनापरवाना खतांची साठवणूक करणा-या व्यावसायिकावर कार्यवाही करावी. शेतक-यांची फसवणूक झाल्यास शिवसेनेच्या स्टाईल उत्तर देण्यात येईल. होणा-या परिणामास कृषी विभाग जबाबदार राहील असा इशारा दिला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या