24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeनांदेड तलाठी केशव थंळगे विरुध्द कारवाई करा; गोविंद अंकुरवाड  

 तलाठी केशव थंळगे विरुध्द कारवाई करा; गोविंद अंकुरवाड  

एकमत ऑनलाईन

ईस्लापुर: पदाच्या अधिकाराचा गैरवापर करुन अतिवूष्टीच्या अनुदानात शासनाची दिशाभुल करुन अनुदान हडप केलेल्या तलाठी के.जे.थंळगे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा.अशी मागणी भाजपाचे अनुसुचित जमातीचे प्रदेश सचिवगोविंद अंकुरवाड यांनी लेखी निवेदनाव्दारे जिल्हाधिकायाकडे केली आहे.

परोटी ता.किनवट येथील सज्जावर कार्यरत असलेले तलाठी केशव जळबा थळंगे यांनी सन २०१९ -२०२० ते २०२१-२०२२ या कालावधीत वेग वेगळया तलाठी सज्जावर कार्यरत असताना अतिवूष्टिच्या अनुदानात शासनाची दिशाभुल करुन स्वताच्या कुंटुबाच्या व्यक्तीचे नाव वेग वेगळया गावात अतिवूष्टी अनुदान यादीत समाविष्ट केलल आहे.

त्या सबंधीत गावात समाविष्ट करण्यात आलेल्या व्यक्तिची जमिन नसताना देखील त्यांना अनुदान बँकेतुन उचलले आहे.असे तक्रारीत म्हटले आहे.
शासकिय सेवेत कार्यरत असलेल्या या तलाठयाने वेग वेगळया गावात नोकरी करत त्या गावातील अनुदान यादीत स्वताच्या नातेवाईकाच्या व्यक्तीचे नाव वेगवेगळया गावात टाकुन शासनाचे अनुदान हडप केल्याने या तलाठयाच्या कारभाराची ईस्लापुर परिसरात जोरदार चर्चा होत आहे.

सदरिल या अपहाराची तात्काळ उच्चस्तरिय चौकशी करुन आपल्या पदाचा गैरवापर करणाया तलाठी केशव थळंगे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा.अशी मागणी लेखी निवेदनाव्दारे भाजपाचे अनुसुचित जमातीचे प्रदेश सचिव गोविंद अंकुरवाड यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

महसुल विभागाच्या किनवटचे सहाय्यक जिल्हाधिकारी,तहसिलदार किनवट व जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाव्दारे मागणी केली असल्याने महसुल विभाग यावर काय कारवाई करेल याकडे या भागातील जनतेचे लक्ष लागले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या