23.8 C
Latur
Friday, September 24, 2021
Homeनांदेडअनधिकृत बायोडिझेल विक्रीविरुद्ध कारवाई करा

अनधिकृत बायोडिझेल विक्रीविरुद्ध कारवाई करा

एकमत ऑनलाईन

नांदेड : देशात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बायोडिझेल विक्री संघटितपणे चालू असून राज्यात ही अनेक ठिकाणी असेच अनधिकृत बायोडिझेल पंप अधिकृत पणे चालू आहेत. हे चालवण्यासाठी शासनाच्या गॅझेट नुसार पेट्रोलियम मंत्रालयाच्या परवानगीची गरज असताना कुठल्याची परवानगी न घेता हे चालू असून, याविरोधात तात्काळ कारवाई करण्याची मागणी नांदेड जिल्हा पेट्रोलपंप असोसिएशनच्यावतीने निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना करण्यात आली आहे.

राज्यासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बायोडिझेल पंप बनावट पद्धतीने मिश्रणे बायोडिझेल या नावाने विकत आहेत. कुठल्याही प्रकारची शासनाची परवानगी न घेता हे विक्री चालत आहे. जे की बायोडिझेल पॉलिसीचे ज्यांची मार्गदर्शक तत्वे महाराष्ट्र शासनाने घालून दिली आहेत. दि.११ मे २०२१ ज्याचे सर्रास उल्लंघन होत आहे. यास कुठल्याही प्रकारची पूर्व परवानगी शासनाद्वारे अथवा विस्फोटक डिपार्टमेंटची परवानगी न घेता व बायोडिझेल पॉलिसीचे धोरण निर्गमितद्वारा महाराष्ट्र शासनाने दि.११ मे २०२१ याचे सरळ उल्लंघन केल्या जात आहे.

सद्यस्थितीत बायोडिझेल च्या नावाखाली ही आऊटलेट्स बी-१०० चे उत्पादन विकत नाही जे की शासनमान्य आहे. त्या ऐवजी त्या नावाखाली ब-याच प्रकारची बनावट उत्पादने ही मंडळी अनधिकृत रित्या विकत आहेत. त्यामुळे अशा अनधिकृत विक्री विरुद्ध तात्काळ कारवाई करण्याची मागणी नांदेड जिल्हा पेट्रोलपंप असोसिएशनच्यावतीने निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना करण्यात आली आहे. यावेळी सतीश किन्हाळकर, चैतन्यबापू देशमुख, मंगेश पावडे, बालाजी बच्चेवार, दिलीप चौधरी, मधुकर मानेकर, आशालताताई पाटील, बॉबी सेठ, नासेरलाला, भारत शिंदे, प्रकाश इंगेवाड, ज्ञानेश्वर लोकमनवार, गिरीष जाधव, विशाल पावडे, नितीन लाटकर आदींची उपस्थिती होती.

नेहरुंच्या धोरणामुळेच देशाचे नुकसान

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या