नांदेड: जिल्ह्यात वाहन चोरट्यांनी धुमाकुळ घातला असून, चोरट्यांनी नायगाव तालुक्यातील गडगा शिवारातून २८ मे रोजी आयशर टेम्पो चोरून नेल्याची घटना घडली.
ट्रकचालक रामदास पुंडलिक कोकुरले (रा. कोलंबी ता. नायगाव) यांनी २८ मे रोजी गडगा शिवारातील भवानी पेट्रोलपंपासमोर आपला आयशर टेम्पो (क्र. एमएच २६ एडी १४८८) लावला होता. ट्रकचालक काही वेळ बाजूला गेले असता अज्ञात तीन चोरट्यांनी सदर टेम्पो चोरून नेला. या प्रकरणी रामदास कोकुरले यांच्या तक्रारीवरून नायगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.