25 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeनांदेडअर्धापूर-नांदेड राष्ट्रीय महामार्गावर टेम्पो-दुचाकीचा अपघात

अर्धापूर-नांदेड राष्ट्रीय महामार्गावर टेम्पो-दुचाकीचा अपघात

एकमत ऑनलाईन

अर्धापूर : अर्धापूर – नांदेड – नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील दि. २९ जून रोजी रात्री ११.०० वाजताचे सुमारास दाभड पाटीजवळ आयश्चर टेम्पो आणि मोटार सायकल यांच्यात अपघात होवून तीन जण जखमी झाले. यातील सखाराम केशवराव राजेगोरे (वय १९ वर्षे ) रा. शेलगाव या तरुण युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर दोन जण नांदेड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे कळते.

अर्धापूर- नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील दाभड पाटीजवळ अर्धापूर कडून नांदेडकडे जाणाऱ्या आयचर टेम्पो क्रं. टी. एस. – १२ – यु. डी. १६८४ या भरधाव वेगातील टेम्पोने उभ्या असलेल्या मोटार सायकल क्रं. एम. एच. – २६ – डब्लू- ४२७७ ला जोरदार धडक दिली. या धडकेत मोटार सायकलच्या बाजुला उभे टाकलेले सखाराम केशवराव राजेगोरे ( वय १९ वर्षे ) हे गंभीर जखमी झाले होते. तर सचिन नागोराव घोडे ( वय २० वर्षे ), भागवत गणपत घोडे सर्व रा. शेलगाव हे जखमी झाले आहेत. यातील सखाराम राजेगोरे (१९ वर्षे ) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

या अपघाताची माहीती मिळताच वसमत फाटा महामार्ग पोलीस प्रभारी अधिकारी शंकर भोसले, सुनिल पाचपोळे, अविनाश धुमाळ, इर्शाद बेग, राजकुमार व्यवहारे, जमादार बालाजी तोरणे, ईश्वर लांडगे, वसंत सिनगारे यांनी जखमींना नांदेड येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या