22.1 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeनांदेडठाकरे समर्थक रस्त्यावर उतरणार, बुधवारी रॅली

ठाकरे समर्थक रस्त्यावर उतरणार, बुधवारी रॅली

एकमत ऑनलाईन

नांदेड : राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभुमीवर येथील शासकीय विश्रामगृह येथे रविवारी दि.२६ जून रोजी जिल्ह्यातील सेना पदाधिका-यांची महत्वपुर्ण बैठक घेण्यात आली़ सदर बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनात रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला असून बुधवार दि.२९ जून रोजी शहरातून रॅली काढण्यात येणार आहे.

शिवसेनेतील बंडखोरीमुळे आघाडी सरकारवर सध्या अस्थिरतेचे ढग घोंगावत आहेत. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांचे समर्थक आक्रमक झाल्याचे दिसून येत आहेत. या सर्व घडामोडीनंतर शिवसेना पदाधिका-यांची रविवार दि.२६ रोजी शासकीय विश्रामगृह येथे एक तातडीची बैठक घेण्यात आली़ यावेळी बुधवार दि. २९ जून रोजी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनात रस्त्यावर उतरून रॅली काढण्याचा निर्णय सर्व पदाधिका-यांच्यावतीने घेण्यात आला. यावेळी उपस्थित शिवसैनिकांना पदाधिका-यांनी मार्गदर्शन ही केले.

भुजंग पाटील म्हणाले की, शिंदे आणि सेना आमदारांनी पुकारलेले हे बंड मोठा आघात आहे, याला जशास तसं उत्तर दिले जाईल. आमदार कल्याणकर यांनी नांदेडचे नाव खराब करून, शिवसैनिक त्यांचे जीवन जगने मुश्कील केल्या शिवाय राहणार नाहीत़ जिल्हाप्रमुख आनंद पाटील बोंढाकर म्हणाले की, आमदारांना अमिष दाखवून नेण्यात आले.

भाजपला हाताशी धरून सेना संपवण्याचा डाव असून, शिवसैनिक याला जशास तस उत्तर देतील़ तर दत्ता कोकाटे यांनी, येणा-या निवडणूका या शिवसेनेच्या नावावर लढवल्या जाणार असून, तसा निर्धार कालच्या मुंबई येथील सभेत करण्यात आला आहे. नांदेडच्या खासदारांनी आधी आपले पाहावं, कल्याणकरचेच काय तुमचेपण केस उपटायची ताकत शिवसैनिकांत आहे असा इशारा अप्रत्यपणे खा़ चिखलीकर यांना दिला. यावेळी माजी आ.नागेश आष्टीकर, धोंडू पाटील, भुजंग पाटील यांनीही मार्गदर्शन केले़

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या