32.5 C
Latur
Thursday, February 25, 2021
Home नांदेड रस्त्यामुळे बाळाचा जीव गेला

रस्त्यामुळे बाळाचा जीव गेला

एकमत ऑनलाईन

किनवट (सुरेश कावळे) : किनवट तालुक्यातील जगदंबा तांडा या गावाला रस्ता नसल्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. एका गर्भवती मातेला रस्ता नसल्यामुळे वाहन मिळाले नाही दवाखान्यात जात असतांना रस्त्यावरच प्रसुती झाली त्यातच नवजात बालकाचा प्राण गेला याची माहिती मिळताच खा.हेमंत पाटलांनी दुचाकीवरून गावात जावून तात्काळ त्या कुटूंबीयांची भेट घेतली सांत्वन केले. व गावाला लवकरच रस्ता देण्यात येईल, असे आश्वसन दिले.

जगदंबातांड्यातील एका गर्भवती मातेच्या प्रसुतीची व्यथा खासदार हेमंत पाटलांना सांगितल्यानंतर खा.पाटलांनी आज (२२ फेब्रुवारी) मोटारसाईकलने जाऊन भेट देऊन कुटूंबाचे सांत्वन केले. शिवाय तांडावाशियांच्या समस्या जाणून घेतल्या. रस्त्याची समस्या तात्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याने नागरीकांनी समाधान व्यक्त केले. गर्भवती मातेला गाडीबैलाने रुग्णालयाकडे घेऊन येतांना रस्त्यातच अर्धवट प्रसुती झाली. प्रथमोपचारानंतर गोकुंदा रुग्णालयाने आदिलाबादकडे पाठवले परंतू तोपर्यंत रस्त्यातच बाळ दगावले असून, आदिलाबादच्या वैद्यकीय तज्ञांनी त्या मातेला सुखरुप बचावण्यात यश मिळवले, हे विशेष.

जगदंबातांडा तसा दूर्लक्षीत असून प्रशासन तीथपर्यंत पोहोचलेच नाही. अंबाडी ग्रामपंचायतीच्या कार्यकक्षेत हा तांडा येतो. कळत नकळत कांही कामे केलीत परंतू मुलभूत आणि ज्याला नागरी सुविधा म्हणतात त्यापासून आजही तांडा वंचित असल्याचे सांगण्यात आले. १७ फेब्रुवारी रोजी तांड्यातील एका गर्भवती मातेला गोकुंदा येथिल उपजिल्हा रुग्णालयात गाडीबैलाने घेऊन येत असतांना घाटातील रस्त्यात आदळाआपट होऊन अर्धवट प्रसुती झाली. गोकुंदा रुग्णालयात आल्यानंतर प्रथमोपचार करुन पुढील उपचारासाठी आदिलाबादकडे पाठवण्यात आले. जगदंबातांडा ते गोकुंदा जवळपास १३ कि.मी. आणि गोकुंदा ते आदिलाबाद ५५ कि.मी.च्या आपटाआपटीत वेळीच उपचार न मिळाल्याने बाळ दगावले. आणि मातेला वाचवण्यात आदिलाबादच्या वैद्यकीय तज्ञांना यश मिळाले, हे विशेष.

या घटनेची माहिती आणि तांड्याच्या व्यथा खासदार हेमंत पाटलांना सांगितल्यानंतर खा.पाटलांनी २२ फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता अचानक भेट दिल्याने तांडावाशियांना आश्चयार्चा धक्का बसणे स्वाभाविक आहे. पीडीत कुटूंबाचे सांत्वन केले. तांड्याच्या समस्या जाणून घेतल्या. घाटातील रस्त्याची समस्या तात्काळ निकाली काढण्याचे आश्वासन देऊन किनवटला आल्यानंतर त्यांनी तहसिलदारांसह सर्व संबंधितांना बोलून समस्या मार्गी लावण्यासाठी सांगितले.

स्वदेशी तेजसच्या मदतीला स्वदेशी उत्तम रडार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,433FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या