32 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeनांदेडफुलवळ येथे राष्ट्रीय महामार्गावरील पूल कोलमडला

फुलवळ येथे राष्ट्रीय महामार्गावरील पूल कोलमडला

एकमत ऑनलाईन

कंधार/नांदेड : कंधार तालुक्यातील फुलवळ येथून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर पुलाचे काम सुरू असतांनाच शुक्रवारी रात्री अचानक हा पुल कोलमडला. सुदैवाने यात कोणतीही जीवीतहानी झाली नाही.मात्र गुत्तेदाराचा हलगर्जीपणा आणि संबंधित अधिका-यांचे होणारे दुर्लक्ष याचे पितळ उघडे पडले आहे.

फुलवळ येथून एक राष्ट्रीय महामार्ग आणि एक राज्य मार्ग जात असून येणा-या काळात याच रस्त्यावरून वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. गेले दीड वर्षांपासून या महामार्गार्चे काम चालू असून आणखी किती दिवस चालेल सांगता येणार नाही परंतु आजही अनेक ठिकाणी खाचखळगे सोडून काम केले जात आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी पुलांचे कामही चालू आहेत.अशाच एका पूलाचे काम फुलवळ येथे गेली काही महिन्यापासून चालू आहे. पुलाच्या मूळव्याचे काम पूर्ण होऊन पूल उभारला खरा, पण त्यावरील स्लॅब टाकल्यानंतर त्याला बॉटमला दिलेले सपोर्ट स्लॅबचा भार तोलू न शकल्याने शुक्रवारी रात्री उशिरा अचानक झुकल्यामुळे पूल हा पूर्णपणे एकाबाजूकडून पूर्णपणे कोलमडला आहे .

सुदैवाने या पुलावरून वाहतूक चालू होण्यापूर्वीच ही घटना घडली.नाही तर वाहतूक चालू असताना जर असा प्रकार घडला असता तर नेमकं किती जणांना जीव गमवावा लागला असता ही कल्पनाच न केलेली बरी अशा प्रतिक्रिया लोकांमधून ऐकायला मिळत आहेत.या हादशामुळे गुत्तेदाराचा हलगर्जीपणा आणि संबंधित अधिका-यांचे होणारे दुर्लक्ष याचे पितळ उघडे पडले आहे. सदर कामाचा दर्जा कसा आहे हे उघड झाले आहे.आतातरी संबंधित वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाकडे जातीने लक्ष देतील का? असा सवाल उपस्थित केला जातो आहे. या कामाची चौकशी करावी अशी मागणी होत आहे.

जनता कर्फ्यूला अभूतपूर्व प्रतिसद

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या