32 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeनांदेडमुख्यमंत्री कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या पिंज-यात अडकले

मुख्यमंत्री कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या पिंज-यात अडकले

एकमत ऑनलाईन

नांदेड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे केवळ सत्तेसाठी काँगे्रस व राष्ट्रवादीसोबत युती करून त्यांच्या पिंज-यात अडकले आहेत.त्यामुळे समाजहिताचा कोणताही निर्णय त्यांना घेता येत नाही. मात्र अजूनही संधी गेली नाही, शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी त्यांनी भिमशक्तीसोबत यावे असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

लोहा तालुक्यातील जामगा शिवणी येथील हल्ला पिडीत कुटुंबियांची भेट घेण्यासाठी मंगळवारी नांदेडात आले होते.यावेळी पत्रकारांसोबत ते बोलत होते. पुढे बोलतांना ना.आठवले म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सद्यस्थितीत मवाळवादी झाले आहेत. कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या पिंज-यात ते अडकून पडले आहेत. त्यांना समाजहिताचे कुठलेही निर्णय घेता येत नाही. आता कॉँग्रेसला आक्रमक नेते नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्षपदी मिळाले आहेत. यामुळे तीन आघाड्यांची सत्ता आता जास्त काळ टिकणार नाही. तेव्हा अजूनही संधी गेलेली नाही, उद्धव ठाकरे यांनी पिंज-यातून बाहेर पडून बाळासाहेबांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी भिमशक्तीसोबत यावे, असे आवाहन केले.

तर समाजातील एकोपा टिकवुन ठेवण्यासाठी समाजामधील जातीय भेदाभेद थांबवायला हवा.याकरिता आंतरजातीय विवाहाला चालना देण्याची गरज आहे. यासाठी शासनासोबतच स्वयंसेवी संस्थांनी पुढे आले पाहिजे.असे स्पष्ट करत क्षुल्लक कारणावरून ही जामगा शिवणीची घटना झाली आहे. गावामध्ये सर्व समाजामध्ये सलोखा निर्माण करण्यासाठी मी जामगा शिवणी येथे आलो आहे.मात्र अशा घटना वाढू नयेत यासाठी दलित बांधवांना सरंक्षण देण्यात यावे अशी मागणी केली.

वंचित आघाडीबद्दल बोलतांना ते म्हणाले की, अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी वंजित बहुजन आघाडी नावाने स्वतंत्र पक्ष निर्माण केला आहे. त्यांचा हा प्रयत्न चांगला आहे. परंतु, एकही उमेदवार निवडून आलेला नाही. सर्व समाजाला एकत्रित करण्यासाठीच रिपब्लिकन पक्ष आहे. सर्व जातीतील लोकांना रिपब्लिकन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे सर्वसमवेशक पक्ष होण्यासाठी बाळासाहेबांनी रिपब्लिकन पक्षासोबत यावे. नवी दिल्लीतील शेतकरी आंदोलन थांबवावे ही शासनाची प्रामाणिक इच्छा आहे. परंतु, स्वत:ला शेतकरी नेते म्हणून मिरविणा-यांकडून हे आंदोलन न्यायालयाच्या निर्णयानंतरही सुरुच आहे. केलेले कायदे रद्द केले तर लोकाशाहीला ते चॅलेंज होईल अशी भिती आहे. त्यामुळे लोकशाहीत तडजोडी कराव्या लागतात हे शेतकरी नेत्यांनी विसरता कामा नये, अशी अपेक्षा ना.आठवले यांनी व्यक्त केली.

दरम्यान नांदेड महापालिकेच्या कारभाराबद्दल ना.आठवले म्हणाले की, नांदेड वाघाळा महापालिकेमध्ये दोन हजार ३५४ स्वच्छता कर्मचा-यांची पदे मंजुर आहेत. प्रत्यक्षात एक हजार ५२४ पदेच भरली आहेत. उर्वरीत पदे तातडीने भरावीत आणि स्वच्छतेसाठी अद्यावत मशीनरी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत,असे ना.आठवले यांनी यावेळी सांगीतले.

परभणी जिल्ह्यात लागू होऊ शकते रात्रीची संचारबंदी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या