23.8 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeनांदेडखड्डेमय पार्डी रस्ता दुरुस्त झाल्याने नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला

खड्डेमय पार्डी रस्ता दुरुस्त झाल्याने नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला

एकमत ऑनलाईन

हिमायतनगर : शहरातून टेभी, आंदेगाव, पार्डी, एकघरी, वाशीकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. याबाबतची नागरिकांनी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांना सांगताच त्यांनी येथील टिकानला प्रत्यक्ष भेट देऊन या रस्त्याची पाहणी केली. तसेच तातडीने या रस्त्यावर रेल्वे ब्रिजच्या अलीकडे पडलेले सर्व खड्डे बुजविण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या ठेकेदाराला सूचना देऊन स्वतः उभे राहून येथील तात्पुरते खड्डे बुजविण्याचे काम करून घेतले आहे या रस्त्यावरील खड्डे बुजविले गेल्यामुळे या रस्त्याने ये-जा करणाऱ्याना नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला अशी प्रतिक्रिया दिल्या लवकरच दिवाळीनंतर या रस्त्यावर कायम स्वरुपी सिमेंट काँक्रेटीकरण करून ह्या रस्त्याचा तोडगा काढणार असल्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी सांगितले आहे.

यामुळे तात्पुरती या रस्त्याची दुरुस्ती झाली असली दिवाळीनंतर या रस्त्याचे कामे नव्याने सुरु केले जाणार असून, दोन्ही बाजूने नाल्या आणि मध्ये रेल्वे पर्यंत सिमेंट काँक्रेटीकरण केले जाणार असल्याने येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले त्यामुळे पुढील गावाला जाणाऱ्या रस्त्याची कायम समस्या दूर केली जाईल असे आश्वासन सुद्धा आ.जवळगावकर यांनी दिले. तसेच रेल्वे अंडर ब्रिज रस्त्याच्या पुढील काम सुद्धा केले जाणार असून, वाशी घाटात सध्या तात्पुरती दुरुस्ती झाली आहे. लवकरच तेलंगणा बॉर्डर रस्त्यापर्यंत सिमेंट काँक्रेटीकरण करून दोन्ही बाजूने सुरक्षा बेरिकेट बसवून अपघात होणार नाही याची काळजी रस्ता बनविताना घेतली जाईल असा मानस असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी शहरानजीक रस्त्याचे खड्डे बुजविताना रस्त्याने ये जा करणाऱ्या नागरिकांनी आमदार साहेबांचे धन्यवाद मानले असून, अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे येथील नागरिकांना मोठ्या अडचणीतून जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याचे सांगितले.

त्यामुळे आता लवकरच या रस्त्याच्या कटकटीपासून कायमची सुटका होईल अशी अपेक्षा पार्डी, एकघरी, वाशी, टेभी, आंदेगाव, पवना, सह आदी गावासह तेलंगणा राज्याकडे जाणाऱ्या नागरिक, प्रवाशांना ह्याची अशा लागली आहे. यावेळी माजी जि.प. सदस्य सुभाष दादा राठोड, डॉ.भिसीकर,माजी तालुका अध्यक्ष जनार्धन ताडेवाड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. प्रकाश वानखेडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक रफीक सेठ, प्रथम नगराध्यक्ष अ. अखील भाई, काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय माने, माजी जी.प.सदस्य समदखॉन पठाण, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे,काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष फेरोज खान , अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष फेरोज खुरेशी, सेवा सहकारी सोसायटीचे संचालक सुभाष शिंदे, मा. नगरसेवक शेख रहीम पटेल, दगडू काईतवाड, बळवंत जाधव, योगेश चिल्कावार, ज्ञानेश्वर शिंदे, बाकी सेठ, असलम भाई भांडेवाले, दिपक काञे, सरपंच सुनिल शिरडे, केरबा सुद्धेवाड, आदीसह अनेक कॉग्रेसचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या