23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeनांदेडप्रचंड परिक्रमा यात्रेत नगर प्रशासनाने भाविकांची केली फसवणूक

प्रचंड परिक्रमा यात्रेत नगर प्रशासनाने भाविकांची केली फसवणूक

एकमत ऑनलाईन

माहूर : करोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षे बंद असलेली परिक्रमा यात्रा आज मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणात माहूरात दाखल झाली. यात्रा व्यवस्थेच्या दृष्टीने दि. ५ ऑगस्ट रोजी घेतलेल्या नियोजनाच्या बैठकीत ठरल्यानुसार नगर प्रशासनाने कोणतीच भूमिका बजावली नसल्याने भाविकांची मोठ्या प्रमाणात फसवणूकच झाली आहे.

नियोजन बैठकीत ठरल्या नुसार नगर प्रशासनाने १) फिरते सुलभ शौचालय व मुतारी यांची कुठेच व्यवस्था केलेली नव्हती.जिथे फिरते शौचालय ठेवले तिथे पाण्याची व्यवस्था नाही व चढण्यासाठी पायरीची व्यवस्था नव्हती. दुसरे फिरते शौचालय ग्यानबाजी केशवे विद्यालयाच्या बाजूला म्हणजेच एक किमी अंतरावर चिखलात फसलेले असून त्यास एकही चाक नाही, तिथे भाविक पोहचण्याचा प्रश्नच येत नाही. २)मातृतीर्थ रस्त्यावर नजर प्रशासनाचे ६ शौचालय असले तरी त्यात पाणी नव्हते व एकास दारही नाही. भाविक स्त्री पुरुषासाठी कुठेही तात्पुरत्या स्वरूपाची व्यवस्था केलेली नव्हती.

३) नगर प्रशासनाने कुठेही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली नाही.त्यामुळे मुतारी, शौचालय व पिण्याच्या पाण्या अभावी भाविकांची प्रचंड गैर सोय झाली.४) नगर प्रशासनाने कुठेही कचरा कुंड्या ठेवल्या नसल्याने सर्वत्र प्लास्टिक द्रोण, पत्रावळी, डीशेस सर्वत्र विखुरलेल्या दिसल्या.५)मार्गदर्शक सूचनेसाठी वाहन तळाच्या जागेत ध्वनीक्षेपक,निवाऱ्यासाठी तंबू व लाईटची व्यवस्था नव्हती.

६)भाविकांच्या दुचाकी,तीनचाकी,चारचाकी, सहाचाकी या वाहनासाठी अनुक्रमे २० रुपये ४० रुपयाच्या वाहनतळ वसुलीच्या पावत्या दिल्या त्यावर मुख्याधिकारी तथा तहसीलदार,पोलीस निरीक्षक असे छापील असून त्यावर कुणाच्याही सह्या नाहीत, यात्रा परिक्रमेची पावती मात्र नवरात्र महोत्सवाची नोंद होती.म्हणजेच बनावट पावत्या देवून लाखों रुपये वसूल करून भविकासह शासनाचीही घोर फसवणूक केली असल्याने आपत्ती व्यवस्थापन प्रमुखावरच “आपत्ती व्यवस्थापनातून फसवणूक ” केल्या प्रकरणी गुन्हा दाखल का केल्या जात नाही? अशी भविकातून ओरड सुरू आहे.

उपरोक्त संदर्भाचे अनुषंगाने मुख्याधिकारी तथा तहसीलदार किशोर यादव यांचेशी दु.२-४५ वा. भ्रमणध्वनी वरून संपर्क साधला असता आज भेटू शकत नाही उद्या पाहुअसे म्हणून भेटण्याचे टाळले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या