27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeनांदेडधर्माबाद शहर खड्ड्यांच्या विळख्यात

धर्माबाद शहर खड्ड्यांच्या विळख्यात

एकमत ऑनलाईन

धर्माबाद : सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत असलेल्या शहरातील व शहरा भोवती रस्त्याची दयनीय अवस्था झाली असुन भयानक मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत.रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था झाली असुन शहराला खड्ड्यानीच वेढले की काय असे चित्र दिसत आहे.याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग निवडुन आलेले लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करित असल्याने त्यांच्या बद्दल नागरीकातुन संताप व्यक्त होत आहे.

धमार्बाद शहर हे तेलंगणा राज्य सिमेलगत असुन शहराचा विकास म्हणावा तसा तर झालाच नाही.कमीत कमी रस्ता तर चांगला असायला पाहिजे पण अधिकारी, लोकप्रतिनिधी व गुत्तेदारानी मिळुन रस्त्याची तर वाटच लावली, शहरा बाहेरील एकही रस्ता धड नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत असलेल्या धमार्बाद शहराभोवती चे शिवमंदिर ( शिवटेकडी) ते तेलंगणा बसस्थानक, नटराज टाकी ते बाळापूर , महाराष्ट्र बसस्थानक ते बेल्लुर,रत्नाळी ते रेल्वे गेट नंबर दोन, फुलेनगर ते येताळा पांइंट,येताळा पांइंट ते शिवमंदिर पर्यंत चे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे.

या रस्त्यावर मोठं मोठें खड्डे पडलेले असुन वाहतूक धारकांना तारेवरची कसरत करावी लागते एवढेच नसून वाहाने खराब होऊन आर्थिक भुर्दंड वाहतूक धारकांना सहन करावा लागतो.कोणत्याही रस्त्याने शहरातुन बाहेर जाताना व बाहेरून शहरात प्रवेश करताना खड्डे पार करूनच जावे लागते.पावसाळ्यात खड्ड्यात पाणी साचल्याने वाहतूक धारकांना पाणी आहे की खड्डा किती मोठा आहे यांचा अंदाजा लागत नसल्याने अपघात होतात. बासर,  येळवत, तानुर, बन्नाळी, करखेली, येताळा, कोंडलवाडी,कारेगाव, बाभळी फाटा,सिरसखोड बेल्लुर, कंदाकुर्ती कोणताही मार्ग आला तरी ही शहरात प्रवेश करताच रस्त्यावरील खड्ड्याचे दर्शन होते.

शहराभोवती असलेले रस्त्याची दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाने पंचवीस वर्षांपूर्वी च केले असून त्यानंतर केलीच नाही.रस्त्यावरचे खड्डे सुद्धा बुजवले जात नाही. या खड्याचा नाहक त्रास होत असल्याने बांधकाम विभाग व निवडुन आलेले लोकप्रतिनिधी बदल तीव्र संताप होत आहे. याबद्दल लोकप्रतिनिधी सुध्दा काही हालचाली करित नाही.

जवळच असलेल्या काही अंतरावर गेले तर तेलंगणा राज्यातील रस्ते चमकतात.तेलगंणातील रस्ते पाहून महाराष्ट्रातील सिमेवरील रस्ते पाहून धमार्बादकरांना लाज वाटायसारखी वेळ येत आहे.असा या सार्वजनिक बांधकाम विभाग व निवडुन आलेले लोकप्रतिनिधी च्या निषेधार्थ नगरसेवक संजय पवार हे दि.१६ सप्टेंबर रोजी धरणे आंदोलन करण्याचा लेखी इशारा दिला आहे.

मायक्रोफायनान्स कंपन्यानी दबाव टाकून कर्ज वसुली करू नये -जिल्हाधिकारी जी. श्रीकांत

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या