नांदेड : देशातील पहिली कोरोना चाचणी पुणे येथील भारत विद्यापीठात कोरोना लसीची चाचणी बारड जि.नांदेड येथील भूमीपुत्र प्रा.रूपेश देशमुख बारडकर यांच्यावर पुणे येथे करण्यात आली आहे.
कोरोना महामारीचे संकट जगासह देशावर ओढावले असून लस तयार करण्यासाठी अनेक कंपन्या देशभरातील तज्ञ डॉक्टर अहोरात्र मेहनत घेत आहेत. मात्र लस उपलब्ध होत नव्हती. अथक प्रयत्नानंतर २७ ऑगस्टरोजी पुणे येथील भारत विद्यापीठात देशातील पहिली कोरोना लसीकरण चाचणी बारड येथील प्रा.रूपेश देशमुख बारडकर यांच्यावर करण्यात आली आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्याला अभिमानाची बाब म्हणून बहुमान मिळाला आहे.
अनेक दिवसापासून कोरोनावर लस उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करून अखेर यश मिळाल्यामुळे नागरिकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यात नांदेड जिल्ह्यातील भुमीपुत्राला देशातील पहिली लस देवुन त्यांच्यावर चाचणी करण्याचा बहुमान प्राप्त झाला आहे. ही अभिमानाची बाब असुन लवकरच देशासह राज्यात व जिल्ह्यात कोरोनावर मात करण्यासाठी लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील, अशी आशा सर्वांनीच व्यक्त केली आहे.
नीट व जेईई परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी रास्त – पालकमंत्री अशोक चव्हाण