25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeनांदेडसर्पदंशाने शेतमजूर तरुणाचा मृत्यू, गावात हळहळ

सर्पदंशाने शेतमजूर तरुणाचा मृत्यू, गावात हळहळ

एकमत ऑनलाईन

निवघा बाजार : येथून जवळच असलेल्या कोळी ता. हदगाव येथील रहिवाशी असलेले शेतमजूर अमोल किसन वाघमारे ( ३३ ) यांचा रविवार ( दि. ३ ) च्या रात्री झोपेत असताना कानाला सर्पदंश झाल्याने त्यास नांदेड येथील शासकीय रुग्णालयात तात्काळ हलविण्यात आले होते.

परंतू उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे पार्थिवावर सोमवार ( दि. ४ ) च्या दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परीवार असून नवतरुण अमोल हा घरातील एकमेव कर्ता असल्याने या कुटूंबावर अमोल च्या जाण्याने आभाळच कोसळल्याच्या भावना कोळी या गावातील अनेकांनी व्यक्त केल्या, अमोलची परीस्थीती अत्यंत हलाखीची असल्याने या कुटुंबास शासकीय मदत मिळावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत असून या घटनेची हळहळ संपूर्ण गावात व्यक्त केली जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या