24.7 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeनांदेडकुंचेली फाट्याजवळील अपघातातील मृतांची संख्या ४ वर

कुंचेली फाट्याजवळील अपघातातील मृतांची संख्या ४ वर

एकमत ऑनलाईन

नरसीफाटा : नांदेड-देगलूर महामार्गावर शंकरनगरपासून जवळच असलेल्या कुंचेली फाट्याजवळ ट्रक आणि कारमध्ये समोरासमोर झालेल्या भीषण अपघातातील मृतांची संख्या ३ वरून ४ झाली आहे. ही घटना दि. ३ जून रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली होती.

नरसीकडून शंकरनगरकडे जाणा-या स्विफ्ट डिझायर कारला शंकरनगरपासून जवळच असलेल्या कुंचेली फाट्याजवळ शंकरनगरहून नरसीकडे येणा-या भरधाव वेगातील एपी ०३ टी.ए. ३१८६ या ट्रकने एम.एच. २५ टी १०७५ स्विफ्ट डिझायर कारला समोरासमोर धडक दिली.

या भीषण अपघातात कारमधील शंकरराव गंगाराम जाधव (५५), महानंदा शंकरराव जाधव (५२, रा. टाकळी तमा, ता. नायगाव) आणि मुलगी कल्पना शिंदे (रा. केरूर, ता. बिलोली) यांचा जागीच मृत्यू झाला तर धनंजय जाधव, स्वाती शिंदे (रा. टाकळी तमा) हे दोन जण गंभीर जखमी झाले होते.

दरम्यान धनंजय शंकर जाधव (५२ वर्षे, रा. टाकळी तमा, ता. नायगाव) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून आता मृतांची संख्या तीनवरून चार झाली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या