28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeनांदेडहरिणाला मिळाले दोन वेळा जीवनदान

हरिणाला मिळाले दोन वेळा जीवनदान

एकमत ऑनलाईन

तामसा : हदगाव तालुक्यातील उमरी जहागीर शिवारात विहिरीत पडलेल्या हरिणाचे शेतकरी व वनविभागाच्या कर्मचाº्यांनी प्राण वाचवून बाहेर काढलेल्या हरणावर कुत्र्याने हल्ला केला. कुत्र्याच्या तावडीतून हरिणाला वाचविण्यात येऊन हरिणाला दोन तासात दोन वेळा जीवनदान मिळाल्याचा थरार बघायला मिळाला.

येथील शेतकरी पंढरी शिंदे यांच्या शेतातील खोल विहिरीमध्ये हरीण शुक्रवारी दुपारी पडले. हरीण पडल्याची माहिती कळताच शेतकरी तेथे जमले. वनविभागाचे तामसा परिमंडळ अधिकारी मनोज गुरसाळी व वनकर्मचारी साहेबराव सूर्यवंशी घटनास्थळी दाखल झाले. खोल व रुंद विहिरीतील हरिणाला काढण्याचे आव्हान होते.

हरीण सुखरूप बाहेर काढण्यासाठी तालुका वन अधिकारी शरयू रुद्रावार यांचे मार्गदर्शन घेत प्रयत्न चालू झाले. गावातील युवक व वन्यजीवप्रेमी गणेश उमरे याने विहिरीत जाऊन हरिणाला दोरीचे व्यवस्थित फासे दिले. खूप वेळाचे पाण्यात पडलेले हरीण अवसान गळाल्यामुळे डुबक्या घेत होते. शेतकरी पंढरी शिंदे, त्र्यंबकराव शिंदे, कैलास लष्कर, मंगेश शिंदे आदींनी काळजीपूर्वक व अथक प्रयत्न करून हरिणाला सुखरूप विहिरी बाहेर काढले. पण विहिरीतून बचावलेल्या हरिणाच्या जीवावरील दुसरे संकट बाजूलाच दडले होते.

हरिणाच्या शरीराला आवळलेले फासे मोकळी करतात शेजारी असलेल्या कुत्र्याने त्याच्यावर झडप टाकली. या प्रकारामुळे घटनास्थळी असलेले शेतकरी व वनाधिकारी देखील हादरले व घाबरले. कुत्र्याच्या तावडीतून हरीणला सोडविले नाहीतर पाण्यातून त्याला वाचविण्याचे प्रयत्न व्यर्थ जाणार होते. त्यामुळे शेतकरी वन अधिका-यांनी कुत्र्याच्या तोंडाला दोन्ही बाजूने वाकवून हरिणाची कुत्र्याच्या जबड्यातून सुटका केली.

ताबडतोब कुत्र्याच्या तोंडावर कापड बांधून त्याला बांधण्यात आले. या हल्ल्यामुळे हरीण कमालीचे भेदरले होते. जखमी झाले होते. हरीणाला पाणी पाजून दहा पंधरा मिनिटांनी उभे केले असता धूम ठोकून त्याने कळपाच्या दिशेने पळ काढला. दोन तासाच्या थरार नाट्यानंतर दोन जीवघेण्या प्रसंगातून हरिणाची सुटका केल्याबद्दल उपस्थितांनी देखील सुटकेचा निश्वास
सोडला.

Read More  हट्ट्यातील तरुणाच्या खुनाचा १२ तासात लागला तपास

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या