25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeनांदेडलोहामध्ये दुष्काळी अनुदानातील शिल्लक रक्कम वाटप सुरू

लोहामध्ये दुष्काळी अनुदानातील शिल्लक रक्कम वाटप सुरू

एकमत ऑनलाईन

लोहा (प्रतिनिधी) : लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदानतील शिल्लक २५ टक्के रक्कम वाटप करण्यास नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सुरुवात केली आहे. शेतकरी मित्र साहेबराव काळे यांनी याबाबत पाठपुरावा केला होता. या मागणीला यश आल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे.

लोहा-कंधार मतदारसंघातील शेतकऱ्यांना अनुदान वाटप करताना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप साहेबराव काळे यांनी केला होता. ७ जूनच्या आधी दुष्काळातील शिल्लक २५ टक्के अनुदान वाटप न केल्यास लोहा तालुक्यातील शेतकर्‍यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला होता. त्यानंतर त्यांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक अजय कदम यांनी भेट घेऊन शिल्लक अनुदान वाटप सुरु केले जाईल, असे सांगितले होते. त्यानुसार तात्काळ हे वाटप बँकेने सुरु केले आहे.

गतवर्षी लोहा तालुक्यासह नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन शेतकऱ्याच्या पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. त्यावर शासनाने दोन हेक्टर पर्यंत शेतकऱ्यांना दुष्काळाचे अनुदान मंजूर करून हे अनुदान जिल्हा बँकेत वाटप करण्यासाठी जमा केले होते. यातील पहिला हप्ता म्हणून ७५ टक्के रक्कम देण्यात आली होती. परंतु, लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांना उर्वरित अनुदानाची २५ टक्के रक्कम मिळत नव्हती. दरम्यान, जिल्हा बँकेने मागणीची दखल घेऊन शेतकऱ्यांना पावसाळा सुरू होण्यापूर्वी अनुदान वाटप केल्यामुळे काळे यांनी बँकेचे आभार मानले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या