22.3 C
Latur
Thursday, March 4, 2021
Home नांदेड जिल्ह्याधिकाऱ्यानी केली थेट बांधावर जाऊन पाहणी

जिल्ह्याधिकाऱ्यानी केली थेट बांधावर जाऊन पाहणी

आमदार जवळगावकर यांच्या मागणीला तात्काळ प्रतिसाद

एकमत ऑनलाईन

हदगाव (प्रतिनिधी) : माधवराव पाटील जवळगावकर यांनी तालुक्यात होत असलेली अतिवृष्टी व संततधार पावसामुळे नदीनाल्यांना आलेल्या पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकरी बांधवांना त्वरित मदत मिळणे बाबत दिनांक २३ सप्टेंबर २०२० रोजी मा. जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली होती.

या मागणीप्रमाणे आज नांदेड जिल्याचे जिल्हाधिकारी डाॅ.विपीन इटनकर यांनी हदगाव तालुक्याची शेतकर्‍यांच्या शेतातील पुराचे पाण्याची व नुकसान ग्रस्त शेतीची पाहाणी करुन शासकीय अधिकार्‍याकडून उपरांत परिस्थितीचा आढावा घेतला, मागील काही दिवसापासून हदगाव हिमायतनगर परिसरात सतत अतिवृष्टी झाली आहे त्यामुळे या अतिवृष्टीने खरीप हंगामातील उडीद, मूग,सोयाबीन, यासह, हळद, उस,या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

सोयाबीन उभ्या पिकांच्या झाडाच्या शेंगाना कोंब फुटले आहेत सर्वत्र शेतात पाणी झाल्यामुळे खरीप पिकांचे पूर्ण नुकसान झाले आहे,व हदगाव तालुक्यातील पैनगंगा नदी नाल्यांना आलेल्या अतिवृष्टी पुरामुळे नुकसान झालेल्या पिकाची पाहणी थेट शेतकऱ्याचा बाधावर जाऊन करतांना नांदेड जिल्याचे,जिल्हाधिकारी मा विपीन इटणकर, हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर तहसीलदार जिवराज डापकर व आदी उपस्थित होते.

मागील काही दिवसांपासून हदगाव हिमायतनगर परिसरात सतत अतिवृष्टी झाली आहे त्यामुळे या अतिवृष्टीने खरीप हंगामातील उडीद मूग व सोयाबीन यासह हळद ऊस या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे .सोयाबीनच्या पिकांच्या उभ्या झाडांना शेंगांना कोंब फुटले आहेत .काही शेतामध्ये उभ्या पिकासह सुपीक माती सुद्धा खरडून गेली तसेच गावांमध्ये घरांची प्रचंड पडझड झाली काही कुटुंब अक्षरचा रस्त्यावर आले. तोंडाशी आलेला घास पळवून नेण्या सारखा झाला . कर्जमाफीची प्रक्रिया अर्धवट झालेली आहे त्याचा जाब आ. जवळगावकर यांनी विचारला होता.

सततच्या पावसामुळे उडीद मूग तर हातचे गेले आता सोयाबीनची ही माती होत असल्याने यंदा हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. क्विंटलने होणारे उत्पादन किलोवर आले. काल इसापूर धरणातून विसर्ग केलेल्या पाण्यामुळे पैनगंगा नदीला पूर येऊन नदीकाठच्या शेतकरी बांधवांच्या शेतीचे संपुर्ण नुकसान झाले आहे. त्यामुळे नेहमी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढणारे आ. जळगावकर यांनी हदगाव हिमायतनगर मध्ये झालेल्या अतिवृष्टी व नदीनाल्यांना आलेल्या पुरांमुळे नुकसानीचे पंचनामे करून माझ्या मतदारसंघातील शेतकरी बांधवांना तात्काळ मदत मिळवून द्यावी अशी मागणी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटणकर यांच्याकडे केली होती.

पांडुरंग कारखान्याच्या चेअरमनपदी प्रशांत परिचारक यांची निवड

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या