35 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeनांदेडआले विभागीय आयुक्तांच्या मना... तेथे कोणाचे चालेना

आले विभागीय आयुक्तांच्या मना… तेथे कोणाचे चालेना

एकमत ऑनलाईन

नांदेड : ऐन कोरोनाच्या संकट काळातही राज्याला घसघसीत महसुल देणारे दारू दुकाने औरंगाबाद पदवीधर मतदार संघ निवडणूकीच्या मतदान दिवशी दि.१ डिसेंबर रोजी केवळ सायंकाळी पाचवाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश उस्मानाबाद व लातूर येथील जिल्हाधिका-यांनी काढले आहेत. यासाठी मुबंई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठाने दिलेल्या आदेशाचा आधार घेतला आहे.परंतू शेजारचा जिल्हा असलेल्या नांदेड जिल्हयात रविवारी सायंकाळपासून जवळपास तीन दिवस दारू दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.यामुळे शासनास लाखो रूपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागणार आहे.

मिळालेल्या माहितीनूसार विभागीय आयुक्तांनी घेतलेल्या या भुमिकेमुळे ,आले विभागीय आयुक्तांच्या मना.. तेथे कोणाचे चालेना अशी चर्चा होत आहे. देशभरात निर्माण झालेल्या कोरोनाच्या संकटाने सर्वांनाच चिंतेत टाकले आहे.प्रारंभी मार्च महिन्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी देशभरात तीन महिने कडक लॉकडाऊन करण्यात आले. या कडक लॉकडाऊनमुळे देश आणि राज्याची अर्थीक स्थिती डबगाईस आली होती. यामुळे नियम अटींचे पालन करण्याचे बंधन घालून जुलै महिन्यापासुन लॉकडाउनमध्ये थोडीशी शिथीलता देत राज्याला दर महा करोडो रूपयांचा घसघसीत महसूल देणारा दारू दुकाने सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्याने घेतला.

सध्या परिस्थीती ब-यापैकी सुधारणा झाल्यामुळे सर्व व्यवहार सुरळीत झाले आहेत. तर दारू दुकाने बियरबार, पुर्वीच्यावेळेप्रमाणे सुरू करण्याचे परवानगी शासनाने दिली आहे. परंतू होवू घातलेल्या औरंगाबाद पदवीधर मतदार संघ निवडणूकीच्या अनुषंगाने मराठवाड्यातील काही जिल्ह्यांनी दारू विक्री बंदीबाबत वेगवेगळे निर्णय घेतले आहेत. यात उस्मानाबाद, लातूर जिल्ह्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार मतदानाच्या दिवशी दि. १ डिसेंबर रोजी केवळ सायंकाळी ५ वाजेपर्यंत दारू दुकाने बंद ठेवण्याचे आदेश तेथील जिल्हाधिका-याने काढले आहेत. नागपूर खंडपीठात महाराष्ट्र वाईन मर्चंट असोशिएसनकडून दारू दुकाने बंद ठेवण्याच्या निर्णयाबाबत याचिका दाखल केली होती.

या याचिकेनुसार खंडपीठाने दिलेल्या आदेशाचा आधार उस्मानाबाद, लातूर जिल्ह्याने घेतला आहे. परंतू शेजारी असलेल्या नांदेड जिल्ह्यात दारू दुकाने जवळपास ३ दिवस बंद ठेवण्याचा विरोधाभासी निर्णय घेण्यात आला आहे. रविवार दि. २९ नाव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपासून ते दि.३० व मतदान दिवस दि. १ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत नांदेड जिल्ह्यातील दारू दुकाने बंद राहणार आहेत, असा हा निर्णय आहे.

दरम्यान नांदेडच्या वाईन असोशिएशनच्या पदाधिका-यांनी दारू विक्री तीन दिवस बंद राहील्यास शासनाचा करोडो रूपयांचा महसूल बुडेल. यासाठी या निर्णयात बदल करावा, अशी मागणी केली. मात्र जिल्हाधिका-यांनी या संदर्भात दारू दुकाने बंद ठेवण्याचा आदेश विभागीय आयुक्तांनी दिलेल्या सुचना व आदेशानुसार काढण्यात आले आहेत. असे सांगीतल्याचे कळते. नागपूर खंडपीठाच्या आदेशाची अंमलबजावणी उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यात होते, परंतू नांदेड जिल्ह्यात होत नाही. हा विरोधाभासी निर्णय असून आले विभागीय आयुक्तांच्या मना… तेथे कोणाचे चालेना .. अशी चर्चा यानिमीत्ताने होत आहे.

जिल्ह्यात १३८ कोरोना मुक्त, तिघांचा मृत्यू, ९३ नवे बाधित

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
168FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या