23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeनांदेडसत्यगणपती मंदिराची दानपेटी फोडली

सत्यगणपती मंदिराची दानपेटी फोडली

एकमत ऑनलाईन

हदगाव : प्रतिनिधी
हरडफ येथे प्रसिद्ध असलेल्या सत्यगणपती मंदिरातील दानपेटी फोडून त्यामधील अंदाजे पन्नास हजार रुपये लंपास केले. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली. दरम्यान याच रात्री चोरांनी गावात असलेल्या बियर शॉपीवर डल्ला मारण्याचा प्रयत्न केला परंतु गावातील लोकांनी आरडाओरडा केल्यानंतर चोरांनी दगडफेक करीत पळ काढला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली.

गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात चोरटयांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. दररोज कुठे ना कुठे चोरीच्या घटना घडत आहेत. चोरीचे सुरू असल्याने नागरिकांत दहशतीचे वातावरण पसरले आहे. परंतु पोलिस मात्र कुठे कर्तव्य निभावत आहेत, असा संताप व्यक्त होत आहे. दोनच दिवसांपूर्वी बाजारवाळकी येथे चोरांनी पैशावर डल्ला मारला तेव्हापासून हे गाव सतर्क होऊन तेथील तरुण मंडळी रात्रभर जागी राहून पहारा देत आहेत. परंतु चोर दररोज प्रत्येक गाव बदलून चो-या करीत आहेत.

दोन आठवड्यापासून चाललेल्या चोरीच्या सत्राला अद्याप तरी आळा बसलेला नाही. तोच शुक्रवारी मध्यरात्री हरडफ येथील प्रसिद्ध सत्यगणपती मंदिरात चोरी झाली. मंदिरात प्रवेश करून येथील दानपेटी फोडून चोरटयांनी अंदाजे पन्नास हजार रुपये लंपास केले. यानंतर चोरांनी गावात असलेल्या बियर शॉपीवर डल्ला मारण्याचा प्रयत्न केला परंतु गावातील लोकांनी आरडाओरडा केल्यानंतर चोरांनी त्यांच्यावर दगडफेक करित पळ काढला. ही घटना सकाळी उघड झाल्याने गावात भिती निर्माण झाली आहे.

दरम्यान चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. ही चोरांची टोळी दुस-या जिल्ह्यातील असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. हदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी रात्रीची गस्त हरडफ व बाजारवाळकीपर्यत वाढवावी अशी मागणी दोन्हीही गावातील नागरिकांतून होत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या