19 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeनांदेडबसमध्ये बसण्याच्या कारणावरून चालकास मारहाण

बसमध्ये बसण्याच्या कारणावरून चालकास मारहाण

एकमत ऑनलाईन

नांदेड : दुचाकीवरून आलेल्या दोघांनी बसमध्ये बसण्याच्या कारणावरून बसच्या चालकास मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची घटना दिÞ१७ रोजी उमरी बायपास रोडवर घडलीÞ या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहेÞ

बसचालक केशव मारोती गायकवाड हे दि १७ रोजी बस क्रमांक एमएच २० बीएल ४६८१ ही गाडी घेऊन भोकरजवळील उमरी बायपास रोडवरून डौरकडे जात होतेÞ तेंव्हा दुपारी ४Þ४५ वाजेच्या सुमारास दुचाकी क्रमांक एमएच २६ बीएस ४६८१ वरून आलेल्या दोघांनी भोकरजवळील उमरी बायपास येथे सदर बस थांबवून दुचाकी चालकाने माझ्यासोबतच्या प्रवाशास बसमध्ये बसवा अशी बस चालकास दमदाटी केलीÞ

मात्र बसचालक केशव गायकवाड याने बसमध्ये जागा नाही असे त्यांना सांगीतले असता, दुचाकीवर आलेल्या दोघा आरोपींनी त्यांना एसटीबसच्या कॅबीनमधून खाली उतरवत शिवीगाळ करत थापडबुक्क्यांनी मारहाण केलीÞ तसेच त्यांच्या अंगावरील एसटी महामंडळाचा गणवेश फाडून आरोपींनी शासकीय कामात अडथळा निर्माण केलाÞ या प्रकारानंतर भोकर डेपोचे बसचालक केशव गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भोकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोउपनि भोंडवे ह्या करीत आहेतÞ दरम्यान बस चालकास मारहाण करणा-यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी भोकर डेपोतील कर्मचा-यांनी पोलीसांना केली आहे

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या