24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeनांदेडग्रामिण विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता ढासळली

ग्रामिण विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता ढासळली

एकमत ऑनलाईन

वाईबााजार : गत वषार्पासून कोरोना महामारीच्या उद्रेकाने टाळेबंदीने शाळाबंद होवुन आभ्यासी शिक्षणावर भर दिला असता ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची परिस्थीती चिंताजनक आहे. विद्यार्थी बाराखडी व पाढे विसरले, सोबतच पुढे शाळा सुरळीत सुरु झाल्यानंतर शाळेत सहज जातील की नाही. ही शंका पालकांच्या मनात घर करत आहे.

मागील मार्च २०२० पासून कोरोनामुळे शाळा बंदच आहेत. विद्यार्थी शिक्षणापासून दूर राहू नयेत म्हणून शासनाने आनलाईन शिक्षणाची सुविधा उपलब्ध केली आहे. प्रत्यक्षात आभ्यासी शिक्षण प्रभावी कारक राहिले नसून ऑनलाईन शिक्षनाच्या नावाखाली मोबाईल हातात पडला असता मुले पे गेम, कार्टून यासारख्या खेळात रंगु लागल्याचे चित्र दिसते. बाहेर फिरण्यापेक्षा जास्त वेळ टिव्हीवर वेगवेगळे कार्यक्रम पाहण्यात वेळ घालवत आहे. शाळेत प्रत्यक्ष दिले जात असलेले शिक्षण अधिक प्रभावी असल्याने दुसरीपासूनच मुलांना उजळणी मुखपाठ होते. आता शाळेपासून दुरावलेल्यांना जोडशब्दाचे वाचन करणेही कठीण जाऊ लागले आहे. चौथी पाचवीच्या मुलांना गुणाकार, भागाकार कसा करावा याचाही विसर पडला आहे.

मागिल जून महिन्यात शाळेकडून पाठ्यपुस्तकाचे वाटण झाले. परंतु कोणत्याही विषयाचे पान उघडून न पाहणा-्या मुलांना यंदाच्या अभ्यासात कोणते धडे अभ्यासासाठी आहेत. याची माहीती नाही. ऑनलाईन शिक्षण केवळ बोटावर मोजता येईल इतके विद्यार्थी करीत असावेत. परंतु इतरांचे काय ? त्यातही यावर्षी परीक्षा रद्द झाल्याने मूले तेवढीच बिनधास्त झाली. परीक्षाच नाही तर अभ्यास कशाला करायचा असे प्रतीउत्तर मुले आपल्या पालकांना देऊ लागली. तसेच माहुर तालुक्यातील अदीवासी व बंजारा बहुल असलेल्या भागातील मुले शाळाच नसल्याने बिनधास्त गोव-या वेचने, मोहफुले गोळा करणे, सरपण वेचने तसेच शेत शिवारात काम करण्याच्या कामाला लागली आहेत. त्यामुळे आता गुरुजींना येणा-या सत्रात चांगलीच दमछाक करावी लागणार आहे.

सर्वाधिक महत्वाची बाब म्हणजे यंदाच्या सत्रात पहील्या ईयत्तेत दाखल झालेली मुले शाळेचे तोंड न पाहता दुसऱ्या ईयत्तेत दाखल झाल्याचे आश्चर्यच आहे. तसेच कुठलीही परीक्षा न देता पुढच्या वर्गात दाखल झाल्याने ह्या विद्यार्थ्यांची फळी नशीबवानच म्हणता येईल. शाळा बंद होवून पूर्णं एक वषार्चा कालावधी लोटून गेला असल्याने काही शिक्षकांना आपण शासकिय कर्मचारी असल्याचा विसर पडला असून विध्यार्थांना ऑनलाईन शिक्षण देणे बंद करत फक्त पूर्णं दिवस व्यसनात राहून समाधान व्यक्त करत आहे.तर काही शिक्षक कर्मचारी राजकिय आखाड्यात उतरुन समर्थक असलेल्या नेत्यांच्या प्रचाराला लागली आहे.येणार्‍या भविष्य काळात राजकारणाच्या व नसेच्या व्यसनाधीन झालेल्या शिक्षकाकडून विध्यार्थांना वरील कोणते शिक्षण मिळेल याची चिंता सुज्ञ व अभ्यासीक गुण असलेल्या नागरिकांना भेडसावत आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे कॉलेजेस बंद आहेत. व्यावसायिक शिक्षण घेत असताना प्रॅक्टीकल होत नाहीत. केवळ ऑनलाइन लेक्चर होत असल्याने फक्त पुस्तकी ज्ञान मिळत आहे. पन प्रॅक्टीकल ज्ञाना पासुन माज्यासह अनेक विद्यार्थी वंचित आहेत. त्यामुळे शिक्षणाचा दर्जा खालावला असुन विद्यार्थ्यांची बौद्धिक वाढ खुंटण्याची शक्यता आहे. सततच्या टाळेबंदी मुळे अनेक अडचणींना विद्यार्थ्यांना तोंड द्यावे लागत आहे. असे मत वाई (बा) येथे राहणा-्या व नामांकित कॉलेजमध्ये बी. फार्मसीचे शिक्षण घेणा-या मयुरेश प्रकाश राजूरकर या एका विद्याथ्यार्चे आहे.

परभणी जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा वेग मंदावला

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या