कुंटूर : नायगाव तालुक्यातील मौजे कृष्णुर येथील रहिवासी असलेल्या गरीब कुटुंबातील शेतकरी स्वतःच्या शेतातील कचरा बाहेर काढण्यासाठी गेला होता. परंतु शेतात लावलेल्या काटेरी तार लावला होता. त्या तारात विद्युत प्रवाह उतरल्यामुळे शेतकऱ्यांचा अचानक हात लागल्याने शॉक लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना कुंटूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या निळेगव्हाण शिवारात दिनांक १३ जून २०२२ रोजी दुपारी अंदाजे दोन ते तीन वाजण्याच्या दरम्यान ही सदरची घटना घडली असल्यामुळे ठाण्याचे सपोनि महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस घटनास्थळी रवाना झाले आहे.
तालुक्यातील मौजे कृष्णूर येथील रहिवासी असलेले मयत विश्वाभंर माणिकराव चेरकेवाड वय ६० वर्ष यांनी स्वतच्या शेताकडे कालपरवा पाऊस पडल्यामुळे शेतातील केर कचरा काढण्यासाठी शेतात गेला होता. परंतु सदरची घटना ही अचानक दुर्दैवी घडली असल्यामुळे कृष्णूर येथे घडल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात असल्याची माहिती बाबाराव बालासाहेब पाटील जाधव कृष्णूर यांनी माहिती दिली असून सदर दुर्दैवी घटनेचा पंचनामा करण्यासाठी कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जेमादार एस एम कुमरे व पॉका अशोक घुमे यांनी घडलेल्या घटनेची पाहणी करुन पंचनामा कारण्यात येत आहे.