18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeनांदेडमालगाडीचा डब्बा पटरीवरून घसरला

मालगाडीचा डब्बा पटरीवरून घसरला

एकमत ऑनलाईन

नांदेड : मुदखेड रेल्वेस्टेशन दरम्यान असलेल्या शिवनगावाजवळ गुरूवारी सकाळी मालगाडीचा डब्बा पटरीवरून घसरून खाली उतरला होता.यामुळे रेल्वेची वाहतुक काही वेळ ठप्प झाली होती.रेल्वेच्या यंत्रनेने तातडीने हालचाली करून हा डब्बा पुन्हा पटरीवर ठेवला.मात्र या घटनेमुळे देवगिरी एक्सप्रेस एका तासाने उशीरा धावली.

कोरोनामुळे सध्या रेल्वे विभागाकडून काही मोजक्या मार्गावर प्रवाशी गाड्या सुरू आहेत.मात्र मालगाड्यांची वाहतुक जास्त प्रमाणात सुरू आहे. गुरूवारी सकाळी सातच्या सुमारास मुदखेड ते उमरी रेल्वे स्टेशन दरम्यान असलेल्या शिवनगावाजवळ नांदेडकडे येणा-या एका मालगाडीचा डब्बा पटरीवरून घसरून खाली उतरला. या घटनेमुळे रेल्वे यंत्रणेची धावपळ उडाली.

अधिकारी,कर्मचा-यांची घटनास्थळी पोहचुन दोन ते तीन तासाच्या प्रयत्नाअंती यंत्रणेच्या सहाय्याने घसरलेला डब्बा पुन्हा पटरीवर आणला. दुपारी साधारण बाराच्या सुमारास रेल्वे वाहतूक धीम्या गतीने सुरु झाली होती.दरम्यान या घटनेमुळे मुंबई- सिकंदराबाद ०७०५७ ही देवगिरी एक्सप्रेस ३ तास थांबविण्यात आली होती.यामुळे नियमित वेळेपेक्षा तासभर उशीरा ही गाडी पुढे रवाना झाली.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या