32 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeनांदेडइंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले

इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले

एकमत ऑनलाईन

देगलूर: केवळ महिनाभरातच पेट्रोल, डिझेल व गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ झाली आहे.या वाढलेल्या इंधन दरावाढीमुळे सर्वसामान्य नागरिक,शेतमजूर,शेतकरी व कामगारांचे आर्थिक कंबरडे मोडले असून जगणेच अवघड झाले आहे.मात्र लोकांनीच आपले प्रतिनिधी म्हणून निवडून दिलेले खासदार,आमदार या दरवाढीवर गप्प बसले आहेत.यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

शेती व्यवसायावर अवलंबून असणारे सर्वसामान्य नागरिक व मजूर वर्ग यांनी बदलत्या परिस्थितीनुरूप दुचाकी व चारचाकी वाहनांचा प्रवासाकरीता गॅस सिलेंडर चा उपयोग करण्याचे धाडस अवलंबिले आहे .मात्र सध्याच्या दरवाढीमुळे सामान्य नागरिकाला सहन शेतकरी शेतमजुरांचे डोळे पांढरे होत आहेत. मागील एक वषार्पासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन च्या काळात शहरी व ग्रामीण भागातील अनेक कंपन्या व लघुउद्योग बंद पडल्यामुळे बेकारीचे सावट निर्माण झाले आहे.शहरी विभागात कामाला असणारे ग्रामीण भागातील बेरोजगार गावाकडे परतले आहेत मात्र गावात सुद्धा त्यांच्या हाताला काम नसल्यामुळे आर्थिक विवंचनेत स्वत:चे व कुटुंबाचे उदरनिर्वाह चालवणे कठीण झाले आहे.

ग़्रामीण भागात शेती व्यवसायावर अवलंबून असणारे शेतकरी शेतमजूर निसर्गाच्या अवकृपेमुळे ह्या वर्षी पडलेल्या अतिवृष्टीमुळे आणि धान पिकांवर आलेला करपा तुडतुडा अशा किडीच्या प्रादुभार्वामुळे उत्पादनात कमालीची घट सहन करीत आहेत. त्यामुळे येथील शेतकरी संपूर्ण हवालदिल झालेला आहे शेतात पुन्हा दुसरे पीक घेण्याची हिंमत नसल्यामुळे मजुरांच्या हाताला काम मिळत नाही सरकारी स्वस्त धान्य दुकान मार्फत मिळणा-या अन्नधान्यावर येथील नागरिक आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसाबसा चांलवीत आहे .त्यातच पुन्हा एकदा नवीन कोरनामुळे लॉकडाऊनचा डोंगर ताठ मानेने समोर उभा होत असल्याचे संकेत मिळत आहेत. अशा कठीण परिस्थितीत शासनामार्फत पेट्रोल डिझेल व गॅस सिलेंडरच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी शेतमजुरांचे कंबरडे मोडून जीवन जगणे कठीण केले जात आहे .

यादरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत भरमसाठ वाढ होऊन नागरिकांना आपला उदरनिर्वाह कसे चालवावे हा प्रश्न सर्वांपुढे पडलेला आहे. दरवाढीच्या व महागाईचा परिणाम गर्भश्रीमंत कर्मचा-यांना जाणवत नसला तरी सर्वसामान्य गरीब शेतकरी शेतमजुरांचे काय मोठ्या अपेक्षेने नागरिकांचे प्रतिनिधी म्हणून पाठवलेल्या क्षेत्रातील आमदार, खासदार यांनी विशेष दखल घेऊन भविष्यात गरिबांचे होणारे बेहाल थांबविण्यासाठी तात्काळ या दरवाढीवर प्रतिबंध घालण्यासाठी आवाज उठवावा अशी मागणी सामान्य नागरिक व शेतकरी शेतमजूर यांच्याकडून होत आहे.

४० लाख ट्रॅक्टरसह संसदेवर धडकणार; टिकैत यांचा केंद्र सरकारला इशारा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या