23.8 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeनांदेडदहावीच्या निकालात मुलींचीच बाजी

दहावीच्या निकालात मुलींचीच बाजी

एकमत ऑनलाईन

नांदेड : कोरोनामुळे तब्बल दीड महिन्याच्या विलंबामुळे बुधवारी दहावीचा आॅनलाईन निकाल जाहीर झाला आहे. यंदाही दहावीच्या निकालात मुलांपेक्षा मुलीनींच बाजी मारली आहे. जिल्ह्याचा निकाल ८९.५३ टक्के इतका लागला. सदरचा निकाल विभागातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत सर्वात कमी आला आहे. यंदा निकालात थोडी घसरण झाली आहे.

कोरोनाच्या संकटामुळे यंदा दहावीच्या निकालास विलंब झाला आहे़ तब्बल दीड महिन्याच्या विलंबानंतर बुधवारी एसएससी बोर्डाने आँनलाईन निकाल जाहीर केला आहे़ नांदेड जिल्ह्यातील ६८९ शाळांमधील ४६ हजार २२२ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यामध्ये २४ हजार ५९५ मुले तर २१ हजार ६२७ मुलींचा समावेश होता.

यात प्रत्यक्षात २४ हजार २६३ मुले व २१ हजार ४२४ मुलींनी परीक्षा दिली. यात २० हजार ९८२ मुले पास झाले. तर ३ हजार २८१ मुले नापास झाली. मुलींमध्ये १९ हजार ९२१ मुली पास झाल्या आहेत. तर १ हजार ५०४ मुली नापास झाल्या. मुलींपेक्षा मुलांचे नापास होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. मुलांच्या पास होण्याचे प्रमाण ८६. ४८ टक्के तर मुलींचे ९२.९९ एवढे आहे.दहावीचा निकाल लांबल्याने विद्यार्थ्यांसह पालकांची चिंता वाढली होती़बारावीनंतर अवघ्या काही दिवसातच दहावीचा निकाल जाहीर झाला आहे.

यात नांदेड तालुका ९१.९५, अर्धापूर ९0.७५, भोकर ८८.५१, बिलोली ९३.१६, देगलूर ८९.१७, धर्माबाद ९१, हदगाव ८६, हिमायतनगर ८४, कंधार ८४.५३, किनवट ८८.१0, लोहा ८८.३१, माहूर ८६.५६, मुखेड ९२.९१, मुदखेड ८४.५0, नायगाव ९१.३८ तर उमरी तालुक्याचा ९१.0३ टक्के निकाल लागला आहे.

Read More  कोविड रुग्णांचा शोध आणि जास्तीत जास्त संपर्क शोधण्यावर भर -उद्धव ठाकरे

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या