25.4 C
Latur
Monday, March 1, 2021
Home नांदेड हदगाव तालुक्यातील एकाही नेत्याच्या गावात ग्रामपंचायत बिनविरोध नाही

हदगाव तालुक्यातील एकाही नेत्याच्या गावात ग्रामपंचायत बिनविरोध नाही

एकमत ऑनलाईन

नांदेड : हदगाव तालुक्यातील आमदार, खासदार, माजी आमदार, माजी खासदार किंवा तालुक्यात गाजलेल्या नेत्यांपैकी एकाही नेत्यांना आपल्या गावातील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध काढता आली नाही. याला शेतकरी संघटनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव शिंदे यांचे गाव उंचेगांव (खु.) ग्रामपंचायत बिनविरोध निघाल्याने अपवाद ठरले आहे.

हदगाव मतदार संघाचे विद्यमान आमदार असलेले माधवराव पाटील जवळगावकर यांच्या जवळगाव येथे एक वेळ खासदार व तीन वेळेस आमदार राहिलेले, माजी खासदार सुभाषराव वानखेडे यांचे ल्याहारी या गावी, माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांचे आष्टी येथे, माजी केंद्रीय मंत्री श्रीमती सूर्यकांता पाटील यांच्या वायपना येथे, बाबुराव कदम यांच्या कोहळी येथे तसेच दुस-या फळीतील बाबुराव पवार यांच्या पाथरड येथे, अनिल पाटील यांच्या बाभळी येथे, गंगाधर पाटील यांच्या चाभरा येथे आणि माजी सभापती बालासाहेब कदम यांच्या निवघा बाजार येथे मोठ्या जोरात ग्रामपंचायत निवडणूक सुरु आहे. नेत्यांच्या गावांमध्ये प्रत्येकाने बिनविरोध निवडणूक करण्यासाठी काही नेत्यांनी प्रयत्न केल्याचे समजते, परंतु गावक-यांनी या नेत्यांच्या शब्दाला थोडाही मान दिला नाही.

कुठे दुरंगी, तिरंगी तर कुठे चौरंगी लढती रंगत आहेत. केवळ शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव शिंदे यांच्या उंचेगाव (खु.) येथे ग्रामपंचायत सदस्यांची निवड अविरोध करण्यात आली. याबाबत शिवाजीराव शिंदे म्हणाले की, बिनविरोध निवड होण्याचे सर्व श्रेय गावक-यांचेच आहे. हदगाव तालुक्यातील वाकी, शिऊर, उंचेगाव (खु), मालेर्गाव, बामणी तांडा, कारला (म), कोपरा, राजवाडी, ब्रह्मवाडी, दिग्रस, रावणगाव (म), ठाकरवाडी, धन्याचीवाडी या तेरा ग्रामपंचायतींचा समावेश आहे. आदी तेरा सर्वसामान्य नेत्यांच्या गावातील नागरिकांनी एकीचे दर्शन घडवत हा आपसातील भांडणाचा कार्यक्रम हाणून पाडला आणि गावात सामाजिक सलोखा जपत ग्रामपंचायत बिनविरोध निवडून दिली. त्यामुळे या १३ गावांमध्ये ग्रामपंचायतचे कारभारी बिनविरोध निवडण्यात आले आहेत.

हिमायतनगर तालुक्यात येणा-या जवळगाव या आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या गावात प्रथमच निवडणूक होत आहे वडील कै. निवृत्ती पाटील जवळगावकर हे आमदार होते. आई जिल्हा परिषद अध्यक्षा होत्या, अनेक वेळा जिल्हा परिषद सदस्यसुद्धा होत्या. आमदार जवळगावकर हे सुद्धा दोन वेळेस आमदार झाले. आतापर्यंत वडिलांच्या व आईच्या कार्यकाळात कधीही निवडणूक झाली नाही. परंतु यावेळेस आमदार जळगावकरांच्या दुर्लक्षामुळे प्रथमच निवडणूक होत आहे,असे बोलले जात आहे.

लसीकरणासाठी केंद्र सरकारकडून नियमावली जाहीर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या