33.7 C
Latur
Monday, March 1, 2021
Home नांदेड गावची ग्रामपंचायत पंढरी आहे तिचे पावित्र्य राखा -आदर्श गावचे सरपंच पेरे पाटील

गावची ग्रामपंचायत पंढरी आहे तिचे पावित्र्य राखा -आदर्श गावचे सरपंच पेरे पाटील

एकमत ऑनलाईन

कुरूळा : आपल्या गावची ग्रामपंचायत ही पंढरी असून हल्ली तिचे पावित्र्य धोक्यात आले आहे. ते पावित्र्य नवनिर्वीचित सदस्यांनी जपावे असे अवाहन आदर्श गाव पाटोदा चे सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी कुरुळा येथील कर्यक्रम प्रसंगी केले. कंधार तालुक्यातील मौजे कुरुळा येथे कुरुळा‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌ सर्कल मधील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन कुरुळा सर्कलमधील युवक नेते तथा जिल्हा परिषद प्रतिनिधी बाळासाहेब गोमारे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रम प्रसंगी भास्करराव पेरे पाटील यांनी नवनिर्वाचित सदस्यांना आवाहन करताना गौरोद्गगार काढले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष हरीहरराव मरशिवणे पाटील, तर उद्घाटक म्हणून तहसीलदार मा.व्यंकटेश मुंडे,नायब तहसीलदार ताडेवाड,विजय चव्हाण,गंगाप्रसाद यन्नावार बाबुराव केंद्रे उमरगेकर,बाबुराव केंद्रे(माजी जि.प.सदस्यास नादेड),बाबुराव केंद्रे,माजी सभापती कालीदास गंगावारे,भानुदास जायेभाये, रामचंद्र राठोड,(पं.स.कंधार),पोलीस निरिक्षक विलास गोबाडे, ए पी आय संग्राम जाधव, .कैलास बळवंतरेखाताई धुळगंडे,बिट जमादार सुनिल पञे,चोपडे साहेब शशंकरराव पा.दिग्रसकर,कुरुळा गावचे ग्रामसेवक कल्लाळे साहेब,आदीची उपस्थीती होती. युवक नेते बाळासाहेब गोमारे यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणातून स्थानीक प्रश्नांचा उहापोह करीत ती आगामी काळात पूर्ण करण्याचा आशावाद व्यक्त केला.

नवनिर्वीचित सदस्यांना मार्गदर्शनफर भाषणाततून पेरे पाटील पुढे बोलताना म्हणाले की, निवडूण येणे महत्वाचे नसून त्यानंतर सदस्य काय करतो ते महत्वाचे आहे. माणूस मोठा झाल्यानंतर तळागगातील माणसाशी असणारी नाळ जपावी ,माज्या गावी मी शिक्षण, स्वच्छता,वनराई ,आरोग्य,या साध्या प्रश्नांवरच लक्ष केंद्रित केले,चांगली भावणा ,शुध्द हेतू असल्यास सर्व कांही होते.चांगल्या भावणेतूनच माझ्या गावचा विकास साध्य झाला.

पक्षीजीवन का आले धोक्यात?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या