33.7 C
Latur
Saturday, February 27, 2021
Home नांदेड कंधार शहरातील कोव्हिड सेंटरचे आरोग्य सुधारले

कंधार शहरातील कोव्हिड सेंटरचे आरोग्य सुधारले

एकमत ऑनलाईन

कंधार : कोरोनामुक्त होण्यासाठी उभारण्यात आलेल्या कोव्हिड सेंटरमधील अस्वच्छते संदर्भात रविवारी दैनिक एकमतच्या ऑनलाईन एक्सक्ल्युव्हमध्ये ‘कोव्हिड सेंटनमध्ये अस्वच्छेचा कहर’ अशी बातमी प्रकाशित करण्यात आली होती.या बातमीची दखल तहसीलदार सखाराम मांडवगडे यांनी घेऊन यंत्रना कामाला लावली.यामुळे कोव्हिड सेंटरमध्ये स्वच्छता करण्यात आली.याबद्दल रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी दै.एकमतचे आभार व्यक्त केले.

कोरोनाबाधित रूग्णांच्या देखभालीसाठी तयार करण्यात आलेल्या शहरातील कोव्हिड सेंटरमधील अस्वच्छता,पिण्याच्या पाणी व इतर सुविधा मिळत नसल्याचा प्रकार रविवारी दैनिक एकमतच्या ऑनलाईन एक्सक्ल्युव्हमध्ये कोव्हिड सेंटनमध्ये अस्वच्छेचा कहरया बातमी स्वरूपातून सचित्र उघड करण्यात आला. या बातमीची तहसीदार सखाराम मांडवगडे यांनी घेऊन यंत्रना कामाला लावली.मुख्याधिकारी व वैद्यकीय अधिक्षक यांना सुचना देत कोव्हिड सेंटरमध्ये सुधारणा करण्यास सांगीतले.

मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे बोलतांना म्हणाले की., सेंटरची स्वच्छता केली असून नगर परिषदे तर्फे वार्ड बॉय नियुक्त केला आहे. फुटलेल्या टाकीमधून पाणी वाया जात होते ते आम्ही बदलत असून फिल्टर मशीनचा पॉईंट बदलत असल्याचे सांगितले. दरम्यान ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षकांनी मात्र बातमी का छापली असे म्हणत दबाव आणत आपल्या चुकीवर पांघरण घालण्याचा प्रयत्न केला.

जय श्रीरामच्या घोषात भर पावसात दुचाकीवरून कावड यात्रा संपन्न

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,436FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या