23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeनांदेडचालकाची तब्येत बिघडली अन् बस रस्त्याखाली उतरली

चालकाची तब्येत बिघडली अन् बस रस्त्याखाली उतरली

एकमत ऑनलाईन

नांदेड : बसचालकाची तब्येत अचानक बिघडल्यामुळे नांदेडवरुन मारतळाकडे जाणारी एसटी महामंडळाची बस रस्त्यावरुन खाली उतरली़ यात पाच प्रवासी किरकोळ जखमी झाले. सदर घटना सोमवारी दुपारी ३ च्या दरम्यान घडली.

नांदेड आगारातील बस क्ऱ एमएच २० डिएल – ६६२ ही बस नांदेडहून लाडका या गावाकडे प्रवासी घेवून जात होती. सोमवारी दुपारी ३ च्या दरम्यान काकांडी पुलाजवळ चालकाला अचानक चक्कर आल्यामुळे त्याचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्यावरुन खाली घसरली.

बस सरळ शेतात जाऊन थांबल्यामुळे मोठा अनर्थ टळला. सदरील घटनेत बसमधील पाच प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी दिली.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या