नांदेड : कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात १७८ कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर २६९ व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे ९० तर टिजेन किट्स तपासणीद्वारे १७९ बाधित आले.
आजच्या एकुण १ हजार ३५३ अहवालापैकी १ हजार १६ अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता ६ हजार १२५ एवढी झाली असून यातील ४ हजार २४०बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे उपचारानंतर घरी सोडण्यात आलेल्या बाधित रुग्णांचे प्रमाण ७२.२१ एवढे झाले आहे. एकुण १ हजार ६६९ बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील १७९बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. शुक्रवार २८ ऑगस्ट रोजी शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात महावीर सोसायटी नांदेड येथील ४८वषार्चा पुरुष, नांदेड खाजगी रुग्णालयात देगलूरनाका येथील ५७वषार्चा पुरुषाचा तर शनिवार २९ ऑगस्ट रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे जुना लोहा येथील ७५ वर्षाच्या एक महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णूपुरी नांदेड येथील ३२ जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथील २, हदगाव कोविड केअर सेंटर४ नायगाव कोविड केअर सेंटर 5, पंजाब भवन कोविड केअर सेंटर ११५, मुदखेड कोविड केअर सेंटर २ धमार्बाद कोविड केअर सेंटर ११, खाजगी रुग्णालयातील ७ असे एकूण १७८बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.
आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र ४२ , अधार्पूर तालुक्यात २, हदगाव २, लोहा 3, कंधार १, उमरी १, नायगाव ४, परभणी २, पुणे १, नांदेड ग्रामीण ६, बिलोली ३, देगलूर ६ किनवट २, मुखेड४, धमार्बाद ८, हिंगोली २, यवतमाळ १ असे एकुण ९० बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपाक्षेत्र ५३, भोकर तालुक्यात १ बिलोली येथे१५, देगलूर येथे १० किनवट येथे ३, कंधार येथे ९, उमरी येथे १४, नायगाव येथे ७, हिंगोली १ निजामाबाद १ नांदेड ग्रामीण येथे १, मुदखेड येथे ४, हदगाव येथे १ लोहा येथे १५ माहूर येथे १, मुखेड येथे २१ धमार्बाद येथे १७, परभणी येथे ३यवतमाळ १ असे एकुण १७८बाधित आढळले.
तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपाक्षेत्र ५३, भोकर तालुक्यात १ बिलोली येथे१५, देगलूर येथे १० किनवट येथे ३, कंधार येथे ९, उमरी येथे १४, नायगाव येथे ७, हिंगोली १ निजामाबाद १ नांदेड ग्रामीण येथे १, मुदखेड येथे ४, हदगाव येथे १ लोहा येथे १५ माहूर येथे १, मुखेड येथे २१ धमार्बाद येथे १७, परभणी येथे ३यवतमाळ १ असे एकुण १७८बाधित आढळले. जिल्ह्यात १ हजार ६६७ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे २००, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे ४३९ जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे ५९, नायगाव कोविड केअर सेंटर येथे ४०, बिलोली कोविड केअर सेंटर येथे ७२, मुखेड कोविड केअर सेंटर येथे १५०, देगलूर जैनब कोविड केअर सेंटर येथे ४३ लोहा कोविड केअर सेंटर येथे ३९ हदगाव कोविड केअर सेंटर 46, भोकर कोविड केअर सेंटर १२, कंधार कोविड केअर सेंटर येथे ३०, किनवट कोविड केअर सेंटर येथे ६७, अधार्पूर कोविड केअर सेंटर येथे 18, मुदखेड कोविड केअर सेटर १९, माहूर कोविड केअर सेंटर येथे ९ आयुर्वेदिक शासकिय रुग्णालय कोविड रुग्णालय सेंटर येथे २१, धमार्बाद कोविड केअर सेंटर येथे५९ उमरी कोविड केअर सेंटर ३६, हिमायतनगर कोविड केअर सेंटर २, बारड कोविड केअर सेंटर ६ खाजगी रुग्णालयात २५३ बाधित, औरंगाबाद येथे संदर्भित१०, निजामाबाद १ मुंबई येथे १ बाधित संदर्भित झाले आहेत. कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू प डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे प सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्लाझमा थेरपी उपचाराचा शुभारंभ
कोविड-१९ च्या संसर्गजन्य आजारातून सावरण्यासाठी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आजपासून प्लाझमा थेरपी अर्थात उपचार पद्धतीची सुरुवात झाल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. सुधिर देशमुख यांनी दिली.
नांदेड जिल्ह्यातील कोविड-19 बाधित, मध्यम अशा स्वरुपाच्या रुग्णांवर प्लाझमा थेरपीने उपचार व्हावेत यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी निर्देश दिले होते. यासाठी लागणारी आवश्यक ती यंत्रसामुग्री याची आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपलब्ध झाली असून अधिष्ठाता डॉ. सुधिर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. धोडिंबा भुरके, डॉ. शीतल राठोड, डॉ. समीर, डॉ. संज्योत गिरी यांच्या उपस्थितीत दोन रुग्णांना प्लाझमा (रक्त) देण्यात आला. वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे.
सशस्त्र सीमा दल प्रशिक्षण केंद्रातील ५० जवानांना कोरोनाची बाधा