34.3 C
Latur
Tuesday, April 13, 2021
Homeउस्मानाबाद‘एकमत’ च्या आरती संग्रह पुस्तिकेचा उपक्रम कौतूकास्पद

‘एकमत’ च्या आरती संग्रह पुस्तिकेचा उपक्रम कौतूकास्पद

एकमत ऑनलाईन

नांदेड : कोणतेही अभियान अथवा उपक्रम असो त्यात सातत्य असेल तर त्याचे महत्व वाढते. दै.निक एकमतच्यावतीने गेल्या ११ वर्षापासुन नवरात्र महोत्सवाच्या अनुषंगाने धार्मिक महत्व असलेल्या विविध आरतींचा संग्रह करून त्याची आरती संग्रह पुस्तिका काढली जाते. हा आरती संग्रह पुस्तीकेचा उपक्रम कौतुकास्पद असून संग्रहीय आहे,असे गौरोद्गार जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी काढले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात रविवारी सकाळी दैनिक एकमतच्या आरती संग्रह पुस्तिकेचे विमोचन जिल्हाधिका-यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी बोलत होते. दरवर्षी दैनिक एकमतच्या वतीने नवरात्र महोत्सवानिमित्त विविध आरतींचा समावेश असलेली आकर्षक व सुबक आरती संग्रह पुस्तिका काढण्यात येते. यंदाही आरती संग्रह पुस्तिका काढण्यात आली आहे. याच आरती संग्रह पुस्तिकेचा विमोचन सोहळा जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटणकर यांच्या हस्ते नियोजन भवनात पार पडला.

यावेळी संत बाबा बलविंदरसिंघजी, आ.अमर राजूरकर, माजी आ. डि.पी.सावंत, पोलिस उपाधिक्षक धनंजय पाटील, एकमतचे आवृत्ती प्रमुख चारूदत्त चौधरी, जिल्हा प्रतिनिधी सुनिल पारडे, वितरणचे राहूल गजेंद्रगडकर, संगणक विभाग प्रमुख सिध्दार्थ राजभोज, रवि नांगरे, तुळशिराम वानखेडे, लॉयन्स क्लबचे डॉ. नवल मालू, विवेक अभ्यंकर, जुगलकिशोर अग्रवाल, मनिष मकन, शिरीष गिते, योगेश जैस्वाल, प्रेमकुमार परवानी आदींची प्रामुख्याने उपस्थित होती.

विमोचन प्रसंगी पुढे बोलतांना जिल्हाधिकारी डॉ.विपीन म्हणाले की, माध्यम ही समाजाचा आरसा आहे. प्रशासनाचा दुवा आहे. दैनंदीन घटनांसह समाजात घडणा-या घडामोडींवर माध्यमांचे लक्ष असते. या जबाबदारीच्या कामासोबत प्रशासनाच्या कामात देखील दैनिक एकमत सहकार्य करत असते. माझी कुटूंब माझी जबाबदारी या उपक्रमातही दैनिक एकमतने प्रसिध्दीच्या नात्याने सहकार्यच केले आहे.

नवरात्र महोत्सवाच्या अनुषंगाने धार्मिक महत्व असलेल्या विविध आरतींची भाविकांना माहिती व्हावी. याचा संग्रह करता यावा यासाठी सातत्याने आरती संग्रह पुस्तिका काढण्यात येते. गेल्या ११ वर्षापासुनचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. या पुस्तिकेमध्ये सर्वच आरत्यांचा समावेश आहे. यामुळे भाविकांना उपयुक्त ठरणारा आहे. असे ते म्हणाले. आ.राजूरकर , माजी आ.डि.पी.सावंत, संत बाबा बलविंदरसिंघजी , उप पोलिस अधिक्षक धनंजय पाटील यांनी देखील आरती संग्रहासंदर्भात गौरोद्गार काढत कौतूक केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.रवि शामराज व माधुरी देशपांडे यांनी केले. यावेळी प्रेम अग्रवाल, जयेश ठक्कर , करण बैस, महेश होकर्णे, सतिश सामते यांचीही उपस्थिती होती.

दरम्यान दैनिक एकमतच्यावतीने काढण्यात आलेल्या आरती संग्रह पुस्तिकेचे एकमतचे राहुल गजेंद्रगडकर ,वृत्तपत्र वितरक संघटनेचे अध्यक्ष बालाजी पवार, उपाध्यक्ष गणेश वडगावकर , संदीप कटकमवार, बाबु जल्देवार यांच्या हस्ते देखील विमोचन झाले.

राज्यावर पुन्हा पावसाचे सावट – पुणे वेधशाळेचा सर्तकतेचा इशारा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या