23.8 C
Latur
Friday, September 24, 2021
Homeनांदेडविमा कंपनीने तात्काळ पंचनामे करुन शेतक-यांना नुकसान भरपाईबाबत कार्यवाही करावी

विमा कंपनीने तात्काळ पंचनामे करुन शेतक-यांना नुकसान भरपाईबाबत कार्यवाही करावी

एकमत ऑनलाईन

नांदेड :- नांदेड जिल्ह्यात नैसर्गिक आपत्ती अंतर्गत नुकसानग्रस्त शेतक-यांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत व ऑफलाईन अर्ज केलेले आहेत अशा एकुण १ लाख १४ हजार ८२५ प्रकरणांबाबत संबंधित विमा कंपनीने तात्काळ पंचनामे करुन शेतक-यांच्या नुकसान भरपाईबाबत त्वरीत कार्यवाही करावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले.

जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्ती अंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजनेची आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. या बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी एस. बी. नादरे, कापूस संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. बी. व्ही. भेदे, कृषि विज्ञान केंद्र पोखणीर्चे शास्त्रज्ञ डॉ. डी. ए. देशमुख, विमा कंपनीचे प्रतिनिधी सौरभ पारगल, शैलेंद्र शर्मा, रवी थोरात, गौतम कदम, नांदेड व देगलूरचे उपविभागीय कृषि अधिकारी आदी उपस्थित होते.

शेतक-यांना केलेल्या आवाहनानंतर नैसर्गिक आपत्तीतून दिलासा मिळावा या उद्देशाने अनेक शेतक-्यांने पुढे येऊन पीक विमा काढलेला आहे. नैसर्गिक आपत्तीतून नुकसानग्रस्त शेतक-्यांना सावरण्यासाठी पीक विमा हा मोठा आधार आहे. परिस्थितीचे गांभीर्य विमा कंपनीने लक्षात घेऊन जिल्ह्यातील १ लाख १४ हजार ८२५ अर्जांचा तात्काळ निपटारा करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत विमा कंपनीकडील प्राप्त अर्जांवर कृषि विभागाच्या समक्ष तात्काळ पंचनामे करुन संबंधित शेतक-्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी विमा कंपनीला दिल्या.

पुढील काळात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान आल्यास विमाधारक शेतक-्यांनी टोल फ्री क्रमांक तसेच पिक विमा ॲपच्या माध्यमातून व ईमेल द्वारे किंवा कृषि व महसूल विभागात प्रत्यक्ष अर्ज देऊन ७२तासात नुकसानीची पूर्व सूचना शेतक-्यांनी द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी यावेळी केले.

२३८ शाळांमध्ये ८ वी ते १२ वीचे वर्ग सुरु

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या