26.6 C
Latur
Monday, March 20, 2023
Homeनांदेडलोहयाच्या लिंगायत स्मशान भूमीचा प्रश्न प्रामुख्याने सोडवू

लोहयाच्या लिंगायत स्मशान भूमीचा प्रश्न प्रामुख्याने सोडवू

एकमत ऑनलाईन

लोहा : प्रतिनिधी
लोहा शहरातील लिंगायत स्मशान भूमीच्या प्रश्न प्राध्यान्याने सोउवू असे आश्वासन जिल्हाधिकारी नांदेड अभिजित राऊत यांनी लोहा नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सावकार सुर्यवंशी यांना दिले.

लोहा नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सावकार सुर्यवंशी यांनी दि.२७ फेब्रुवारी रोजी नांदेड जिल्हाचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सदिच्छा भेट देऊन त्यांना लोहा येथील लिंगायत समाज बांधवाच्या स्मशानभूमीच्या कामासाठी निवेदन दिले.

निवेदनात नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांनी पूढे असे नमूद केले की नियोजन विभागाच्या अखत्यारीत जिल्हा वार्षीक योजना अंतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजना ( जिल्हास्तर ) मधुन लिंगायत स्मशानभूमी विकसीत करावी याबाबत ४ नोव्हेंबर २०२२ ला पत्र दिले होते. या विषया बाबत संदर्भिय क्र०१ चा प्रस्ताव व सदर्भीय क्र.०२ चे विनंती पत्राच्या अनुषंगाने पुनश्च विनंती करन्यात येते की लोहा शहरातील काही अविकसीत भागात विकास कामे करण्यासाठी निधी मिळावा यासाठी मुख्याधिकारी न.पा.लोहा यांनी एकूण ७ विभाग कामाकरीता ३ कोटी ४२ लक्ष ८२ हजार रुपयांचा निधी मिळावा म्हणून उपरोक्त संदर्भ क्र.०१ अन्वये प्रस्ताविक केलेले सदरिल कामासाठी मी आपणाकडे विनंती पत्र दिलेले आहे.ज्यामुळे काहीतरी निधी मंजूर होईल व त्यातुन शहरातील विकासकामे करता येतील अशी अपेक्षा होती परंतु जिल्हा नियोजन समितीमध्ये आमच्या प्रस्तवाचा विचार झालेला दिसुन येत नाही.

तेव्हा मी आपल्या निर्दशनास आणू इच्छितो की शहरात स्मशानभूमीची व्यवस्था करणे हे अधिनियमातील तरतुदीनुसार नगर परिषदेचे कर्तव्य आहे.परंतु लोहा न.पा.चे अल्प उत्पन्न्‍ व त्यातुन आत्यावश्यक सेवेसाठी खर्च यामुळे स्वनिधीतून स्मशानभूची व्यवस्था करणे अशक्य आहे. तरी पण लोहा शहरात लिंगायत समाजासाठी समशाभूमी उपलब्ध नसल्यामुळे नगर परिषदेच्या स्वनिधीतून लोहा न.प हदीतील गट क्र.३८८ मध्ये १२ आर इतकी जागा खरेदी करण्यात आली ती विकसीत करणे अत्यंत आवश्यक आहे.

म्हणून सदर्भीय प्रस्तावातील एक ७ कामापैकी अनु.क्र.०२ वर न.पा.लोहा प्रभाग क्र.०७ येथील गट नं.३८८ मधील लिंगायतसमशानभूमी बांधकाम करुन विकसीत करणे हे काम नमुद करुन त्यासाठी ६७ लक्ष २७ हजार रुपयाची प्रस्ताविक मागनी करण्यात आली आहे. ती तात्काळ जिल्हाधिकारी साहेबांनी मंजूर करवा अशी विनंती अशी विंनती नगराध्यक्ष गजानन सावकार सुर्यवंशी यांनी केली असता ती तात्काळ मान्य करुन लोहा येथील लिंगायत स्मशानभूमीच्या प्रश्न प्राधान्याने सोडवू असे आश्वासन जिल्हाधीकारी अभिजित राऊत यांनी नगराध्यक्ष गजानन सावकार सुर्यवंशी यांना दिले. त्यामुळे लोहा शहरातील बहुसंख्य असणा-या लिंगायत समाज बांधवाच्या स्मशानभूमीचा प्रश्न लवकरच मार्गी लागुन कामास सुरुवात होणार आहे अशी माहिती नगराध्यक्ष गजानन सावकार सर्युवंशी यांनी दिली आहे.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या