21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeनांदेडसातशे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी जैन संघटनेने स्वीकारली

सातशे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी जैन संघटनेने स्वीकारली

एकमत ऑनलाईन

नांदेड : कोविडमुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांचे सर्वात मोठे नुकसान झाले आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून कोविडमुळे अनाथ झालेल्या ७०० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी भारतीय जैन संघटनेने स्वीकारली. भारतीय जैन संघटनेने (इखर) लातूर भूकंपातील १२०० भूकंपग्रस्त विद्यार्थी, मेळघाट व ठाण्यातील ११०० आदिवासी विद्यार्थी, आत्महत्याग्रस्त शेतक-यांचे ७०० विद्यार्थी असे मागील ३० वर्षात एकूण ३००० विद्यार्थ्यांना मानसिक तणावातून बाहेर काढून त्यांचे शैक्षणिक पुनर्वसन पूर्ण करून त्यांना एक कर्तबगार, जबाबदार व संवेदनशील नागरिक बनविण्याचे कार्य यशस्वीपणे केले आहे. अशा विद्यार्थ्यांना मानसिक तणावातून बाहेर काढण्यासाठी देश पातळीवरील वरिष्ठ मानसोपचार तज्ञांच्या सल्ल्याने व पुण्यातील सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञांच्या सहाय्याने, संशोधनावर आधारित उपचार करून त्याचे रिपोर्ट्स बनविण्यात आले आहेत. देशातील हा सर्वात मोठा प्रयोग आहे. याचा फायदा कोविडमुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांना नक्कीच होईल याची आम्हाला खात्री आहे.

भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील कोविडमुळे आई वडिलांचे, किंवा वडिलांचे किंवा आईचे छत्र हरपलेल्या इ. ५ वी ते १२ वी पर्यंत मराठी माध्यम व सेमी इंग्रजी माध्यम मध्ये शिक्षण घेत असणा-या अनाथ विद्यार्थ्यांची यादी घेतील. तसेच त्यांच्या घरी जाऊन त्यांना पुणे येथे शिक्षणासाठी पाठविण्याकरिता पालकांची संमती घेऊन जिल्हाधिका-्यांची परवानगी घेतील. बीजेएसच्या वाघोली, पुणे येथील शैक्षणिक संकुलातील मराठी व सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये इ ५ वी ते ११ वी मध्ये शिक्षण घेणा-या प्रत्येकी १०० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार असून त्याच संकुलात विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, नास्ता, भोजन, खेळ, अधिकचा अभ्यास, दवाखाना, मानसोपचार तज्ञांचा सल्ला, विविध प्रकारच्या स्पर्धा इत्यादी सर्व बाबींची व्यवस्था उपलब्ध आहे.

महाराष्ट्र राज्य शासनाने १९९३ सालापासून आजपर्यंत या संकुलात वेगवेगळ्या आपत्तीमध्ये अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी सहकार्य केले आहे. यावेळीही राज्य शासनाचे सहकार्य आम्हास लाभत आहे. भारतीय जैन संघटना मागील ३० वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीच्या क्षेत्रामध्ये अविरत कार्य करीत आहे. कोविडमध्ये सुद्धा मार्च २०२० पासून मोबाईल डिस्पेन्सरी सेवा, मिशन झिरो, प्लाज्मा डोनर्स जीवनदाता योजना, रक्तदान चळवळ, सेरो सव्हेर्लंस, कोविड केअर सेंटर्स,मिशन लसीकरण, मिशन ऑक्सिजन बँक व मिशन राहत या उपक्रमांच्या माध्यमातून कोरोना विरोधातील लढा देत आहे.

नांदेड जिल्ह्यातील कोविडमुळे आई वडिलांचे, किंवा वडिलांचे किंवा आईचे छत्र हरपलेल्या इ. ५ वी ते ११ वी पर्यंत मराठी माध्यम व सेमी इंग्रजी माध्यमा मध्ये शिक्षण घेत असणा-या अनाथ विद्यार्थ्यांची यादी प्रशासना कडून प्राप्त करून घेणार असून भारतीय जैन संघटनेचे कार्यकर्ते प्रत्येक विध्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना पुणे येथे शिक्षणासाठी पाठविण्याकरिता पालकांची संमती मिळवतील व राज्यशासनाने शाळा व वसतीगृह सुरु केल्या नंतर जिल्हाधिका-्यांच्या परवानगीने पुढील शिक्षणा साठी त्यांना वाघोली पुणे येथे पाठविण्यात येईल अशी माहिती इखर चे राज्य कार्यकारीणी सदस्य हर्षद शहा व नांदेडचे प्रकल्प प्रमुख राजीव जैन यांनी दिली.

शहरातील रूग्णालयांनी जादा आकारलेले २ कोटी अडीच लाख केले कमी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या