24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeनांदेडकिनवट-नांदेड पर्यायी रस्ता पाण्यात बुडाला

किनवट-नांदेड पर्यायी रस्ता पाण्यात बुडाला

एकमत ऑनलाईन

नांदेड/किनवट : हवामन खात्याने दिलेल्या अंदाजा नुसार शुक्रवार पासून पावसाची रिमझीम सुरु झाली रविवारी मात्र पावसाने रुद्ररुप धारण करत जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. किनवट-नांदेड महामार्गावर काम सुरु असलेल्या ठिकाणचे पर्यायी रस्ते पाण्यात बुडाले असून अनेक वेळ वाहतूक ठप्प झाली होती. तर मुखेड येथे पावसाने जोरदार हजेरी लावल्याने बाजारपेठेत पाणी शिरले आहे. किनवट नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील कोठारी ते चिखली फाटा दरम्यान ४ ते ५ पुलाचे काम अत्यंत संत गतीने चालु असल्याने या ठिकाणी पयार्यी बनवलेले रस्ते थोडा जरी पाऊस झाला तरी त्यावरून पाणी जावून बंद होत असल्याने वहातूक अनेक तास ठप होत आहे .

राष्ट्रीय महामार्गावरील चिखली फाटा ते कोठारी रोड चे काम व पुलाचे काम खुपच संत गतीने चालु असल्याने उन्हाळ्यातच निधार्रीत वेळेत पुर्ण होणारी न झाल्याने तालुक्यातील जनतेला थोडा जरी पाऊस झाला तरी जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे . ७ जुलै रोजी रात्री पाऊस मोठा झाल्याने दुसर.्या दिवसी १२ वाजेपर्यंत जवळ पास १५ तास वहातूक ठप होती . तर पुन्हा ९ जुलै रोजी दुपारी मोठा पाऊस झाल्याने तीन तास वहातूक ठप्प होती . सध्या दोन तीन दिवसा पासून पाऊस चालु आसल्याने परिसरातील मौजे बेंदी व चिखली गावातील शेतकरी , मजुर , महीला , पुरुष यांना घरी जाण्यासाठी कमरे पर्यंत च्या वाहत्या पाण्यातुन जीव मुठीत धरुन रस्ता पार करावा लागतो आहे .

किनवट तालुक्यात राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे अल्पशा पावसामुळे नागरीकांना वाहतुक ठप झाल्याने तासन तास तीथेच ताटकळत बसावे लागत आहे. याला सर्वस्वी जबाबदार राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरील कंत्राटदाराची शुन्य नियोजनच जबाबदार आहे.

मुखेड येथे बाजार पेठेत पाणी
रविवारी झालेल्या जोरदार पावसामुळे मुखेड शहरातील मुखेड शहरातील अनेक सखल भागात बाजार पेठेत पाणी शिरल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. रविवारी दुपार पासून मुखेड तालुक्यात जोरदार अतिवृष्टी झाली. त्यात अनेक परिसर जलमय झाला होता. पावसाने लावलेल्या जोरदार हजेरीमुळे नदी नाले तुडूंब भरले आहेत. दोन दिवसापासून रिमझीम पावसाला सुरुवात झाली होती. मात्र रविवारी झालेल्या मुसळधार पावसाने शेतीच्या अनेक सकल भागात पाणी शिरले आहे. कवळे पिक जोरदार पावसाने वाहून जाण्याची शक्यता शेतक-यांनी वर्तवली आहे. रात्री उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता.

एअर इंडियाचे उड्डाण: नांदेड-अमृतसर-दिल्ली विमानसेवा ३ ऑगस्टपासून पुन्हा सुरू होणार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या