27.3 C
Latur
Tuesday, October 19, 2021
Homeनांदेडगोकुंदा येथिल कोविड सेंटर बनले असुविधाचे माहेरघर

गोकुंदा येथिल कोविड सेंटर बनले असुविधाचे माहेरघर

नांदेड जिल्ह्याच्या पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी किनवट, माहुर भागाकडे लक्ष देणे आवश्यक आहे.मात्र किनवटबद्दला त्यांची दुजाभावाची वागणुक ही काय नविन नाही परंतु कोरोना सारख्या काळात तरी माणुसकीच्या नात्यांने पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी किनवट माहुर तालुक्यातील आरोग्य विषयक समस्या सोडवाव्यात, अशी अपेक्षा प्रकाश राठोड यांनी व्यक्त केली आहे.

एकमत ऑनलाईन

किनवट:कोरोना विषाणु संक्रमीत रुग्ण वाढत असतांना गोकुंदा येथिल उपजिल्हा रुग्णालयातील कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना असुविधाचा सामना करावा लागत आहे. याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी व नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी दुर्लक्ष केल्याने किनवट येथिल आरोग्य यंत्रणेवर कोणाचेही नियंत्रण नाही असे दिसून येत आहे,असा आरोप करित कोविड सेंटरमध्ये दजेर्दार सुविधा द्याव्यात अन्यथा राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षा तर्फे तिव्र आंदोलन करण्यात येईल अशा इशारा रा.कॉ चे ता.अध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड यांनी दिला आहे.

स्थानिक लोकप्रतिनिधींनी केलेल्या दुर्लक्षामुळे उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटर मध्ये नागरीकांना अनंत समस्यांना समोरे जावे लागत आहे. यात प्रामुख्याने उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांना मिळणारे जेवन हे अत्यंत निकृष्ट दजार्चे आहे असे ही राठोड यांनी सांगितले. तर नागरीक रुग्णालयात गेल्यावर कोरोना चाचणी करण्याच्या वेळा, कोरोना चाचणी कुठे होणार? रुग्णालयात कोणते विभाग कोठे आहे या बाबी कळण्याकरिता कोणत्याही प्रकारचे दिशादर्शक फकल लावण्यात आलेले नाही यामुळे देखिल या कोरोना आजारात नागरीकांची हेळसांड होत आहे. रुग्णालयातील कोणताही कर्मचारी सहकार्याच्या भावनेने काम करत नाही.

उपजिल्हा रुग्णालयात साधे व्हिलचेअर नाही यामुळे -हदयविकार असो अथवा इतर कोणतेही आजार रुग्णाला नातेवाईकाच्या खांद्याचा आधार घेऊनच फरफटत दाखल व्हावे लागत आहे. यामुळे एखाद्यावेळी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासोबतच या सेंटरमध्ये दाखल पॉझिटीव्ह रुग्णांना आवश्यक औषध उपलब्ध करुन देण्यात येत नाही, जे कि आय.सी.एम.आर सारख्या संस्थेने सुचवले आहेक़ाही अत्यवस्त रुग्णांना रेमडिशन इंजेक्शन लागते त्याची किंमत खुप जास्त आहे.

ते गोर गरीबांना विकत घेणे परवडत नाही अशा स्थितीत या सर्व बाबीवर नियंत्रन ठेवणे हे स्थानिक लोकप्रतिनिधीचे काम आहे परंतु कोरोना काळापासुन त्यांनी या बाबीकडे दुर्लक्ष केले आहे असा आरोप ही राठोड यांनी केला आहेक़ोविड सेंटरमध्ये बेडची संख्या वाढवण्यात यावी अशी मागणी मी निवेदनाव्दारे दोन महिण्यापुर्वीच केली होती त्या बद्दल कोणत्याही स्वरुपाची कारवाई केली नाही .यामुळे आजच्या स्थितीत बेड उपलब्ध नसल्याने अनेक रुग्णांना नांदेड, आदिलाबाद, हैद्राबाद या ठीकाणी जावे लागत आहे.

किनवट येथुन एखादा रुग्ण नांदेड येथे रेफर केल्यानंतर त्यास नांदेड येथे अनेक किचकट अडचणींचा सामना करावा लागत आहे. तिथे रुग्णाला घेत नाहीत यामुळे नागरीकांना अनंत त्रास होत आहे गोकुंदा कोविड सेंटर येथे रूग्णांना सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे भेट घेऊन विनंती करणार आहे,असे राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे ता.अध्यक्ष राठोड यांनी एकमतशी बोलतांना सांगीतले.

पंढरपूर शहरातील व्यापा-यांची रॅपिड कोरोना तपासणी होणार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या