26.9 C
Latur
Monday, July 4, 2022
Homeनांदेडभ्रमणध्वनीच ठरताहेत तलाठ्यांचे संपर्क कार्यालय

भ्रमणध्वनीच ठरताहेत तलाठ्यांचे संपर्क कार्यालय

एकमत ऑनलाईन

देगलूर : तालुक्यातील बहुतांश तलाठी सज्जाच्या ठिकाणी न राहता देगलुरमधून ये-जा करीत असल्याने शेतक-यांची कामे खोळंबली आहेत. त्यांच्या मोबाईलवर संपर्क करतच आहेत शेतक-यांना ते असतील त्या ठिकाणी जावे लागते. याकडे महसूलच्या वरिष्ठ अधिका-यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.

देगलूर तालुक्यातील हणेगाव, मरखेल, करडखेड, मालेगाव, लोणी, शहापूर, खानापूर, नरंगल, मानूर आदी गावातील तलाठी आपल्या सज्जाच्या ठिकाणी न जाता देगलुरमधून कारभार पाहतात. त्यांचे मोबाईल हेच त्यांचे संपर्क कार्यालये बनून राहिली आहेत.

अनेक गावातील तलाठ्यांचे गावक-यांना महिन्यातून एखादेवेळीच दर्शन होते. त्यामुळे कामासाठी तलाठी सज्जावर आलेल्या लोकांच्या चकरा वाया जात आहेत. तलाठ्यांशी मोबाईलवर संपर्क साधून ते सांगतील त्या ठिकाणी या लोकांना जावे लागते. विशेष म्हणजे महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारीही याकडे लक्ष देत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या