21.9 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeनांदेडसोन्याचा हव्यास नडला, पाच लाखास लुबाडले

सोन्याचा हव्यास नडला, पाच लाखास लुबाडले

एकमत ऑनलाईन

नांदेड : तेलंगणा राज्यातील एका व्यक्तीला कमी भावात सोने घेण्याचा हव्यास चांगलाच नडला आहे़ सोने देतो म्हणणा-या भामट्याांनी पाच लाख रुपयांची बॅग लुबाडून नेल्याची घटना किनवट येथील एमआयडीसी परिसरात घडली़.

तेलंगणा राज्यातील आर.रमेश लक्ष्मय्या यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते सोमेश्वर ता.बांसवाडा जि.कामारेड्डी येथील रहिवासी आहेत. काही भामट्यांनी त्यांना कमी भावात सोने देतो म्हणून किनवट येथे बोलावले. किनवटच्या कोठारी एमआयडीसी परिसरात ४ जुलै रोजी दुपारी १२़३० च्या सुमारास रमेश देवकर, अजित बेले, विष्णु मेटकर, चंदू बेले आणि रमेश देवकरचा मानलेला भावजी आणि इतर दोन लोकांची नावे माहित नाहीत अशा सर्वांनी त्यांच्याकडून ५ लाख रुपये असलेली बॅग घेतली.

त्याबदल्यात सोने मागितले असता कुठचे सोने असे सांगून रकम लुबाडून पळून गेले. किनवट पोलिसांनी या बाबत भारतीय दंड संहितेच्या कलम ४२०,३४ नुसार गुन दाखल केला आहे. या गुन्ह्या तपास पोलिस निरीक्षक अभिमन्यु साळुंके यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरिक्षक पवार हे करीत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या